सोशल मिडीयावरुन (Social Media) 'ॲमेझॉन गिफ्ट' (Amazon Gift) चे मुंबईकरांना (Mumbai) संदेश पाठविले जात आहेत.'ॲमेझॉन पे (Amazon Pay) ई-गिफ्ट विथ 10000' असे नमूद करून त्यामध्ये पाठविण्यात आलेल्या लिंकवर (Link) लवकरात लवकर जाऊन भेटवस्तू (Gift) मिळवा, असे नमूद केलेले आहे. तरी तुम्हालाही जर अशा पध्दतीचा मेसेज (Message) आला असेल तर सावधान. कारण ही धोक्याची घंटा आहे. या संदेशावर (Message) कुणीही प्रतिसाद देऊ नये आणि अनोळखी क्रमांकावरून (Unknown Number) आलेल्या कोणत्याही लिंकवर (Link) क्लिक (Click) करू नये, असे आवाहन पोलिसांनी (Mumbai Police) केले.विशेष म्हणजे मेसेज (Message) पाठवणारा हा नंबरवर मुंबईचे पोलिस (Mumbai Police) आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Fansalkar) यांचे छायाचित्र प्रोफाइलवर (Profile) ठेवून याप्रकारे मेसेजेस (Messages) करण्यात येत आहेत. तरी ही बाब अत्यंत गंभीर आहे. दस्तुर खुद्द मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नावाने अशा प्रकारे फसवणूकीचे मेसेज (Fraud Message) करणाऱ्याचा शोध मुंबई पोलिस (Mumbai Police) घेत आहेत.
ही सायबर फसवणूक (Cyber Crime) असून कुणीही यावर प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांच्या (Mumbai Police) वतीने करण्यात आले. या आधीदेखील अशाच प्रकारे बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या नावांचा, छायाचित्रांचा वापर करून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. हा बनावट मेसेज (Fraud Message) आलेल्या काही नागरिकांनी मुंबई पोलिस आयुक्तालयात दिली. तर या प्रकारचा कुठलाही मेसेज मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) पाठवलेला नाही अशी पुष्टी पोलिस आयुक्तालयाने केली. तरी संबंधीत प्रकरणाची मुंबई पोलिस सखोल चौकशी करत आहेत. (हे ही वाचा:- HM Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन)
या संदेशावर कुणीही प्रतिसाद देऊ नये आणि अनोळखी क्रमांकावरून (Unknown Number) आलेल्या कोणत्याही लिंकवर (Link) क्लिक (Click) करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस दिशाभूल करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.