HM Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन
अमित शाहांच्या या दौऱ्याला गणपती दर्शन स्पेशल दौरा अशीही चर्चा आहे. तरी राज्यातील सत्तातरानंतर केंद्रीय गृहमंत्री यांचा हा पहिलाचं दौरा असल्याने हा दौरा राज्यातील राजकीय दृष्या महत्वाचा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Central Home Minister Amit Shah) हे 5 सप्टेंबरला मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. दरम्यान अमित शाह (Amit Shah) लालबागच्या राजाचं (Laubaug Cha Raja) घेणार दर्शन घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभुमिवर शाहांच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे. या दौऱ्या दरम्यान अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शासकीय निवास स्थानी वर्षा बंगल्यावर जावून गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis), मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) या नेत्यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतील. अमित शाहांच्या या दौऱ्याला गणपती दर्शन स्पेशल दौरा अशीही चर्चा आहे. तरी राज्यातील सत्तातरानंतर केंद्रीय गृहमंत्री यांचा हा पहिलाचं दौरा असल्याने हा दौरा राज्यातील राजकीय दृष्या महत्वाचा आहे.
यापूर्वीही गणेशोत्सवा (Ganeshotsav 2022) दरम्यान अमित शाहा यांनी लालबागच्या राज्याचं दर्शन घेतलं आहे. पण कोरोना (Corona) महामारीनंतर (Pandemic) या वर्षी पहिल्यांदाचं गणोशोत्सव (Ganpati Festival) पार पडत आहे. तरी अमित शाहांची ही उपस्थिती लक्षणीय आहे. दरम्यान शाह मुंबईचं राधाय दैवत सिध्दविनायकाचं (Siddhivinayak) देखील दर्शन घेणार आहेत. तरी नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाकडे अमित शाह काय मागणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. गृहमंत्री अमित शाहांच्या (Home Minister Amit Shah) या दौऱ्याच्या पार्श्वभुमिवर शहरात कडोकोट बंदोबस्त असणार आहे. (हे ही वाचा:- Toll Free Travel to Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा)
लाडक्या बाप्पाचं आगमन अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलं आहे. मुंबईतील (Mumbai) लालबागच्या राज्याच्या (Lalbaug Cha Raja) दर्शनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. राजकारणी असो सिनेअभिनेते वा उद्योगपती लालबाबग राज्याच्या चरणी सगळेचं नतमस्तक होतात. म्हणूनचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हा मुंबई दौरा विशेष आहे. तरी या दौऱ्या दरम्यान राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2022 11:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

