COVID19 Self Testing Guidelines: घरच्या घरी कोरोनाची चाचणी करता आहात? महापालिकेची 'ही' नियमावली जरुर वाचा
COID19 Test Kit (Photo Credits-Twitter)

COVID19 Self Testing Guidelines: राज्यात कोरोनासह त्याच्या नव्या वेरियंटच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक सध्या वाढत आहे. अशातच प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र लसीकरणावर ही अधिक भर देण्यासह कोरोनाच्या चाचण्यांवर ही अधिक लक्ष दिले जात आहे. अशातच घरच्या घरी कोरोनाची चाचणी करण्यासाठी एक किट सुद्धा शिखाला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याच किट संदर्भात आता मुंबई महापालिकेने गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत.(Covid Test at Home: घरीच कोविड19 च्या चाचणीसाठी टेस्ट किटचा कसा वापर कराल? जाणून घ्या येथे अधिक)

मुंबई महापालिकेने सेल्फ टेस्टिंग संदर्भात गाइडलाइन्स जाहीर करत असे म्हटले की, टेस्टिंग किटची मागणी अधिक वाढली गेली आहे. परंतु पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची नोंद होत नसल्याचे ही आढळून आले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा नेमका आकडा कळून येत नाही आहे. याच कारणास्तव आता घरगुती चाचण्या किंवा रॅपिड अँटिजेन किटचे उत्पादक-विक्रेते यांना त्यासंदर्भातील माहिती महापालिकेला देणे अनिवार्य असणार आहे. तर जाणून घ्या महापालिकेच्या या किट संदर्भातील गाइडलाइन्सबद्दल अधिक.(BMC WhatsApp Chatbot Launch; आता कोविड 19 लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग पासून पाण्याच्या बिल पर्यंत 'ही' सारी कामं होणार व्हॉटसअ‍ॅप वर, पहा नंबर!)

-सेल्फ टेस्टिंग किटची विक्री करणारे किंवा उत्पादकांना त्याची माहिती महापालिकेला द्यावी लागणार आहे.

-केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर, दवाखाने किंवा नागरिकांना विक्री केलेल्या किटची माहिती बी फॉर्ममध्ये आयुक्त, FDA यांना ईमेल द्वारे द्यावी. त्यासाठी whogmp.mahafda@gmail.com किंवा mcgm.hometests@gmail.com हा इ-मेल आयडी दिला आहे.

-केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर/ दवाखाने होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या खरेदीदाराला बिल जारी करतील आणि ज्या ग्राहकांना होम टेस्टिंग अँटीजेन किट्स विक्रीची नोंद ठेवावी लागणार आहे.-आयुक्त, FDA हे मुंबईतील खरेदार नागरिक सर्व केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर्स आणि वितरकांच्या होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या वितरण आणि विक्रीवर लक्ष ठेवून असणार आहेत.

आयसीएमद्वारे सेल्फ टेस्ट किटसह त्याचे एक अॅप सुद्धा लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपवर 15 मिनिटांचा अलार्म सेट करण्यात आला आहे. अलार्म वाजल्यानंतर तुम्ही तुमचा रिपोर्ट पाहू शकता. जर टेस्ट कार्डवर C आणि T या दोन्ही रेषा येत असतील तर तुमची चाचणी पॉझिटिव्ह आहे. तसेच फक्त सी रेष आल्यास तुमची चाचणी निगेटिव्ह आणि टी रेष दाखवल्यास किंवा कोणतीही रेष न दाखवल्यास तुम्ही योग्य पद्धतीने चाचणी केली नाही असे कळेल. त्याचसोबत रिपोर्ट आल्यानंतर टेस्ट कार्डचा फोटो काढून तो अॅपवर अपलोड करावा लागणार आहे.