मुंबई महानगरपालिकेमध्ये आज My BMC WhatsApp Chatbot ही सेवा लॉन्च करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेल्या या सुविधेमध्ये एका क्लिकवर मुंबईकरांना कोविड 19 लसीकरण साठी स्लॉट बुकिंग, पाण्याचे बिल, विवाह नोंदणी प्रमाणपत्रसाठी, नागरी सुविधांच्या समाधानासाठी संपर्क साधता येणार आहे. यामध्ये तुम्हांला केवळ व्हॉट्सअॅप वर +918999228999 वर Hi पाठवायचं आहे. हानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे.
BMC Tweet
आता व्हॉट्सॲप मुंबई म्हणत आम्ही आलो आहोत व्हॉट्सॲप वर!
आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.https://t.co/tacdAeQomD#BMCLaFaktaWhatsappKara#BMCJustAHiAway pic.twitter.com/krxyv8Vu7U
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)