Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus Vaccination:  मुंबईत महापालिकेकडून खासगी रुग्णालयात कोरोनाच्या विरोधातील दिल्या जाणाऱ्या लसीचे लसीकरण मोहिम सुरु होण्याची शक्यता आहे. अद्याप या बद्दल ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. खासगी रुग्णालयाच्या काही प्रमुखांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्याच सुविधेच्या माध्यमातून लसीकरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.(Coronavirus Vaccination: कोरोना व्हायरस लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती)

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी या बद्दल असे म्हटले की, यावर अंतिम निर्णय शुक्रवारी घेतला जाणार आहे. त्याचसोबत त्यांना लसीच्या साठवणूकीसह व्यक्तींच्या संख्याबळाबद्दल विचारले आहे. त्यामुळे जर खासगी रुग्णालयाकडे नियमानुसार सर्व काही असल्यास त्यांना परवानगी दिली जाणार आहे. महापालिका आणि खासगी रुग्णांलयांमध्ये समन्वय घालणारे डॉ. गौतम बंन्साळी यांनी असे म्हटले की, टाटा मेमोरियल रुग्णालयात 4 हजार कर्मचारी असून ते लसीकरणाचे काम करु शकतात. त्याचसोबत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 3 हजार कर्मचारी आहेत.

तर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्यात लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीकरणासाठी सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या केंद्रात सुद्धा वाढ होत असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात दररोज 45 हजारापर्यंत कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. त्याचसोबत कोविन पोर्टलवर सुद्धा 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असल्याचे ही टोपे यांनी सांगितले होते.(Together We Can Win म्हणत सुदर्शन पटनायक यांनी कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या स्वागतासाठी साकारले सुंदर वाळुशिल्प! See Pic)

दरम्यान, भारतात 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरणाला  सुरुवात झाली आणि अवघ्या काही कालावधीत कोरोना लस दिलेला भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. आरोग्य मंत्रालयाने  दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 57.75 लाखांहून अधिक लाभार्थींना कोविड-19 लस देण्यात आली आहे. लसीकरण्याचा उत्पादनात देखील भारत अग्रेसर असून जवळपासच्या गरजू देशांना लस पुरवण्याचे कामही भारत करत आहे. आतापर्यंत 57,75,322 व्यक्तींना कोरोना व्हायरसची लस देण्यात आली आहे.