Sudarsan Pattnaik Sand Art (Photo Credits: @sudarsansand/ Twitter)

आजपासून (16 जानेवारी) कोविड-19 (Covid-19) च्या देशव्यापी लसीकरण मोहिमेला (Vaccination Drive) सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने वाळुशिल्पकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनी पुरी बीचवर (Puri Beach) एक सुंदर सँड आर्ट साकारले आहे. यात त्यांनी कोविड-19 लसीचे स्वागत करत 'एकत्रितपणे आपण जिंकू' (Together We Can Win) असा संदेशही लिहिला आहे. दरम्यान, ही कलाकृती अनेकांच्या पसंतीस उतरत असून सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सुदर्शन यांनी या वाळुशिल्पाचा फोटो ट्विट करत लिहिले की, सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या स्वागतासाठी एकत्रितपणे आपण जिंकू या संदेशासह पुरी बीचवरील माझे सँड आर्ट.

या वाळूशिल्पात तुम्ही पाहू शकता की, निळसर गोल पृर्थ्वीवर भारत साकारला आहे. त्यावर तिरंगा दिसत आहे. भारताला कोरोनाने व्यापले आहे. बाजूला कोविड-19 लसीची कुपी दिसत आहे. शेजारी कोविड व्हॅसिन लिहिलेले इंजेक्शन कोरोनाला टोचताना दाखवण्यात आले आहे. आणि त्यावर Together We Can Win असा एकात्मतेचा मेसेजद दिसत आहे. एकंदर हे शिल्प अत्यंत सुरेख आहे. रंगानी छान सजवण्यात आलं आहे आणि त्याच्या सौंदर्यात मागील निळाशार समुद्र भर घालत आहे.

Sudarsan Pattnaik Tweet:

देशातील पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली असून त्यात  1 कोटी आरोग्यसेवक, 2 कोटी फ्रंटलाईन वर्कर्सस अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि 27 कोटी ज्येष्ठ नागरिकांना विशेषत: 50 वर्षांवरील व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे.

दरम्यान, 2021 च्या स्वागतासाठी साकारलेल्या वाळूशिल्पात त्यांनी नवावर्षात कोरोनावरील लस मिळेल अशी नवी आशा देणारं सँडआर्ट साकारलं होतं. यापूर्वीही अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी वाळूशिल्पाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.