New Year 2021 निमित्त वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचं आकर्षक Sand Art!
SandArt by Sudarshan Patnaik (Photo Credits: Twitter)

ओडिसाचे वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक (Sudarshan Patnaik) त्यांच्या सुरेख, आखिव रेखीव वाळू शिल्पातून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत असतात. अनेक थोरामोठ्यांचे वाढदिवस, विशेष दिन यानिमित्ताने क्रिएटीव्ह शिल्प साकारत ते शुभेच्छा देत असतात. तसंच सामाजिक विषयावर भाष्य करणारं शिल्प ते साकारतात. आता नववर्षानिमित्त त्यांनी भुवनेश्वर (Bhubaneswar) येथील पुरी बीचवर (Puri Beach) आकर्षक शिल्प साकारले आहे. यात नववर्षाच्या शुभेच्छा देत या वर्षात कोविड-19 संकटाला नष्ट करणारी लस उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. (Rajinikanth Turns 70: वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत साकारले सुंदर सँडआर्ट!)

या नव्या शिल्पाचे फोटो त्यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केले आहेत. त्यात त्यांनी लिहिले की, "नवे वर्ष, नवी आशा! लस उपलब्ध झाल्याने जगावर आलेल्या कोविड-19 संकटाचा अंत होईल, अशी आम्हाला आसा आहे. पुरी बीचवरील माझे सँड आर्ट. हॅप्पी न्यू ईयर 2021." या शिल्पात त्यांनी 2021 असं लिहित 1 हा अंक इंजेक्शनच्या रुपात दाखवला आहे. त्यावर पृर्थ्वी दाखवण्यात आली आहे. वर न्यू होप तर खाली हॅप्पी न्यू ईयर असे लिहिण्यात आले आहे. हे कलात्मकता नक्कीच लक्षवेधी आहे.

Sudarsan Pattnaik Tweet:

2020 चं हे वर्ष कोविड-19 संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे वेगळं ठरलं. अथक प्रयत्नांनंतर कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असला तरी धोका कायम आहे. त्यासह आपण नववर्षात पर्दापण केलं आहे. त्यामुळे या नव्या वर्षात कोरोना वरील लस मिळेल आणि संकटाचा अंत होईल, अशी आशा जगातील प्रत्येकाच्या मनी आहे. त्यामुळे सुदर्शन पटनायक यांनी साकारलेलं हे वाळूशिल्प अगदी साजेसे आहे.