देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून जर बचाव करायचा असल्यास नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या दरम्यान नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये असे ही सांगितले आहे. यापूर्वी डब्लूएचओ यांनी कोरोना व्हायरस हवेतून पसरत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच कोरोना व्हायरस झालेल्या व्यक्तीमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात याची सुद्धा माहिती दिली होती. त्यानंतर आता दिल्लीतील आयसीएमआर (ICMR) यांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो असे नमूद करणारी सुचनावली जारी केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी अद्याप ठोस कोणतेही औषध नाही आहे. परंतु देशभरातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र कोरोनासंक्रमित रुग्णांवर उपचार करत आहेत. तसेच कोरोनाच्या संशयित काही रुग्णांना क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णापासून नागरिकांनी 1 मीटरचे अंतर ठेवून बातचीत करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर आता धुम्र विरहित तंबाखू उत्पादने चघळल्याने लाळ उत्पन्न होते. त्यामुळे आपल्या थुंकण्याची इच्छा झाल्याने आपण थुंकतो. याच कारणामुळे कोरोना व्हायरस प्रसरण्याची शक्यता अधिक असते. त्याचसोबत दाट लोकवस्ती असलेल्या भागात स्थलांतर केलेले नागरिक बहुसंख्य प्रमाणात आले आहेत. या भागात निर्वासित केंद्रात कोरोनाची रॅपिड अँटी बॉडी आधारित रक्त चाचणी करण्यात येणार आहे.(Health Tips: Quarantine च्या काळात 'अशा' पौष्टिक पदार्थांचा तुमच्या आहारात असावा समावेश, WHO ने केले मार्गदर्शन)
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे, #COVID19 चा प्रसार वाढू शकतो असे नमूद करणारी सुचनावली @ICMRDELHI कडून जारी.
धुम्र विरहित तंबाखू उत्पादने चघळल्याने लाळ उत्पन्न होते आणि थुंकण्याची प्रबळ इच्छा होते असे आयसीएमआर ने म्हटले आहे - JS, @MoHFW_INDIA https://t.co/BsZYj3R3aC
— PIB in Maharashtra 🇮🇳 #StayHome (@PIBMumbai) April 5, 2020
दरम्यान, आरोग्यमंत्रालयाने आतापर्यंतीची कोरोनाबाधितांसह मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार भारतात कोरोनाचे संक्रमण झाल्याचे 33474 रुग्ण तर 79 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खासकरुन जेष्ठनागरिक, दमा किंवा मधूमेह असलेल्या रुग्णांनी आपली काळजी घेणे अत्यावश्यक आहे. याच संदर्भातील सुचनावली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली होती.