
जगात थैमान घालणार्या कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटामध्ये सार्यांनाच 'वर्क फ्रॉम होम' करण्याचा पर्याय नाही. या कठीण प्रसंगामध्ये आरोग्य क्षेत्राशी निगडीत अनेक मंडळी थेट रस्त्यावर उतरून,लोकांमध्ये जाऊन आपलं कर्तव्य निभावत आहेत. म्हणूनच पुण्यामध्ये जिल्हा परिषदेकडून अशा कर्तव्यदक्ष कर्मचार्यांसाठी 1कोटी पर्यंत लाईफ इन्श्युरंस सह अत्यावश्यक गोष्टी दिल्या जात आहेत.यामध्ये आशा वर्कर्स, हेल्थ ऑफिसर्स, मेडिकल ऑफिसर्स, तालुका हेल्थ ऑफिसर्स सह ग्राम सेवकांचाही समावेश करण्यात आला आहे. कर्मचार्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांना इंन्शुरंसची गरज होती. ही केवळ शारिरीक आरोग्याच्या सुरक्षेसाठी नव्हे तर या कर्मचार्यांवरील मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठीदेखील मदत करणार आहे.
सध्या पुण्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय अधिकारी दारोदारी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत. सोबतच त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरस बाबत जनजागृती पसरवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून सेफ्टी गिअर्स देखील दिले जाणार आहेत. यामुळे त्यांना अधिक सुरक्षित आणि सक्षमतेने काम करता येणार आहे. Coronavirus: महाराष्ट्रात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बळी, मुंबईत 16 तर पुण्यात 2 नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 320 वर पोहचला.
कोरोना व्हायरसचा धोका केवळ शहरी आणि उच्चभ्रू भागापुरता आता मर्यादीत राहिलेला नाही. राज्यात अनेक ठिकाणी कानाकोपर्यात तो झपाट्याने पोहचण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता प्रशासनाने नागरिकांची तपासणी करायला सुरूवात केली आहे. अद्याप कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी कोणताच ठोस उपचार नसल्याने त्याला रोखण्यासाठी खबरदारी बाळगणं इतकंच आपल्या हातामध्ये आहे.