Lockdown: लॉकडाऊन काळात 'मनरेगा' देतंय ग्रामीण जनतेला साथ; राज्यात 42 हजार 292 कामांवर 3 लाख 82 हजार मजूर कार्यरत
MGNREGA | (Photo Credits: Twitter/@MahaDGIPR)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्या आला. अचानक जाहीर झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील हातावर पोट असलेले मजूर, नागरिक, छोटे शेतकरी, उद्योजक, कामगार, स्थलांतरीत कामगार या सर्वांच्याच रोजी रोडीचा प्रश्न निर्माण झाला. अशा काळात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) ग्रामीण भागातील जनतेच्या कामी आली आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा (MGNREGA) अंतर्गत राज्यातील 3 लाख 81 हजार 930 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्याचे मनरेगा आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी याबाबत माहिती दिली. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या या योजनेमुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील नागरिकांना कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नसल्याचेही आयुक्त नायक यांनी या वेळी सांगितले.

राज्याचे मनरेगा आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजघडीला 35 हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देण्यात आली असून ती वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरुपाची आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध झाली आहेत. मनरेगाच्या कामांतून साधारण 14 लाख लोकांसाठी रोजगारनिर्मिती झाली आहे, अशी माहितीही ए.एस.आर. नायक यांनी दिली आहे. (हेही वाचा, Lockdown: ग्रामीण महाराष्ट्रात MGNREG कामे सुरु; रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती)

प्राप्त माहितीनुसार मनेरगाच्या माध्यमातून 4 एप्रिल रोजी राज्यात 19 हजार 509 मजूरव विविध कामांवर कार्यरत होते. त्यानंतर पुढच्या एक महिन्यातच म्हणजे 4 मे रोजी 3 लाख 81 हजार 930 मजूर राज्यात विविध कामांवर कार्यरत झाले. त्यापैकी व्यक्तिगत पातळीवर 3 लाख 81 हजार 930 तर सामूहिक पातळीवर 43 हजार 292 मजूर कार्यरत आहेत. मनरेगाच्या माध्यमातून राज्यात 7 हजार विविध प्रकारचे कामे पूर्ण झाली आहेत. या कामावर असलेल्या प्रत्येकाला 15 दिवसाच्या आत त्यांची मजुरी थेट बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा केली जाते. मजूरांसाठी आलेल्या निधीपैकी 40 कोटी रुपयाचे वाटप पूर्ण झाले आहे. सरासरी सांगाची तर राज्यातील 96 टक्के मजुरांना मजूरीची रक्कम वेळेवर दिली आहे, अशी माहितीही मनरेगा आयुक्त ए.एस.आर.नायक यांनी दिली आहे.