Sandipan Bhumare | (Photo Credits: Facebook)

लॉकडाऊन (Lockdown) काळात ठप्प झालेला ग्रामीण भागातील रोजगार पुन्हा सुरु करण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (MGNREGA) योजनेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली आहेत, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी दिली आहे. तसेच, ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांनी या योजनेतील कामाचा लाभ घ्यावा असेही भुमरे यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागात सुरु करण्यात आलेल्या रोहयो कामांबाबत माहिती देताना संदुप भुमरे यांनी म्हटले आहे की, जलसंधारण, सिंचन विहिरी, पशुंसाठी गोठ्याचे बांधकाम, फलोत्पादन आदी वैयक्तिक स्वरुपाच्या कामांसोबतच शेतीला जोडणारे रस्ते, जलसंधारण, नाला सरळीकरण, सामूहिक विहिरी, वृक्षारोपणाची पूर्वतयारी, ग्रामीण रस्त्यांची कामे सुलभ होणार आहेत. (हेही वाचा, Lockdown: वृत्तपत्र घरोघरी वितरण करण्यावरील बंदी राज्य सरकारने हटविली मात्र 'या' भागांकरिता बंधने कायम)

ट्विट

दरम्यान, गावनिहाय मंजूर कामांचे नियोजन करून त्यानुसार प्रत्यक्ष कामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच, जिल्हास्तरावर रोहयोचे उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. काही समस्या असल्यास लाभार्थ्यांनी रोहयो सचिव, आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहनही रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी केले आहे.