Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिव वाढत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश आणखी काही दिवस वाढवले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास आधीपासूनच घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचे नियम अधिक कठोर असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक घरात अडकून पडले आहेत. तसेच सरकारने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवनागी नाकारली आहे. याच पार्श्वभुमीवर विरार येथे एका नवजात बालकाचे बारसे व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून पार पाडले आहे. त्यामुळे सोशल डिन्टंन्सिंगच्या नियमाचे सुद्धा पालन करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

नवजात बालकाचे बासरे आपल्याकडे धामधुमीत केले जाते. मात्र देशातील एकूणच कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहे. तसेच नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या चिमुकल्याचे बासरे चक्क व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून विरार येथे करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्स यांनी अधिक माहिती दिली आहे. नवजात बालकाच्या पालकांनी नातेवाईक आणि शेजारील व्यक्तींना घरी न येता व्हिडिओ कॉलिंगच्या द्वारे बारश्याचा सोहळा उरकला आहे.(Coronavirus Outbreak in Maharashtra: नागपूर मध्ये आजच्या दिवशी कोरोनाचे 9 नवे रुग्ण! जिल्ह्यातील Covid 19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 72) 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच पोलिसांकडून सुद्धा नागरिकांना कोरोनाच्या विरोधात लढायचे असल्यास घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर नागपूर येथे पोलिसांकडून कोरोनाची प्रतिकृती असलेला पुतळा उभारत कोरोनासंदर्भात जनजागृती करत आहेत.