Amritsar Blast (फोटो सौजन्य - PIT)

Amritsar Blast: पंजाबमधील अमृतसर (Amritsar) मध्ये आज सकाळी एका हिंदू मंदिराबाहेर स्फोट (Blast) झाला. खांडवाला परिसरातील ठाकूर शेरशाह सूरी रोडवरील ठाकूरद्वारा मंदिराजवळ (Thakurdwara Temple) दोन दुचाकीस्वार तरुणांनी ग्रेनेड फेकून स्फोट (Grenade Attack) घडवून आणला. हल्ल्याच्या वेळी मंदिराचे पुजारी आत होते. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणी मंदिरावर स्फोटके फेकल्याचं दिसत आहे.

या तरुणांच्या हातात एक झेंडाही दिसला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण मंदिराबाहेर बाईक थांबवतात आणि काहीतरी फेकून पळून जातात. ते निघून जाताच, एक मोठा स्फोट होतो. ही घटना रात्री 12:30 च्या सुमारास घडली. अमृतसर पोलिसांनी हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होते हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा हल्ला कोणत्या प्रकारचा होता आणि तो का करण्यात आला? याचा तपास आसा पोलिस करत आहेत. (Explosion In Bhandara's Ordinance Factory: महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट; किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती (Video))

पहा व्हिडिओ -

स्फोटाच्या आवाजामुळे काचा आणि खिडक्या फुटल्या -

दरम्यान, या स्फोटाची माहिती देताना वकील किरणप्रीत सिंह यांनी सांगितले की, रात्री 12:30 च्या सुमारास दोन जण दुचाकीवरून आले. ते ठाकूर द्वार मंदिराबाहेर थांबले. त्यांनी रेकी केली आणि मंदिरावर ग्रेनेड फेकून पळ काढला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा परिणाम आजूबाजूच्या इमारतींवरही झाला. बाजूच्या इमारतींच्या खिडक्या तुटल्या.

तथापि, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले असून त्यानुसार हा ग्रेनेड हल्ला असल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोटाचा आवाज ऐकून जवळपास राहणारे लोक घराबाहेर पडले. मंदिराचे पुजारीही बाहेर आले. या स्फोटात कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.