PM Modi Invites Sunita to India | File Image

पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी NASA astronaut Sunita Williams यांना पत्र लिहित भारत भेटीचं आमंत्रण दिलं आहे. मागील 9 महिन्यांपासून अवकाशात अडकलेल्या सुनिता विल्यम्स आता पृथ्वीवर येणार आहेत. भारतातही त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. पीएम मोदींनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, "तुम्ही आमच्यापासून हजारो मैल दूर असलात तरी तुम्ही आमच्या हृदयाच्या जवळ आहात." हे पत्र अंतराळवीर माईक मॅसिमिनो यांच्यामार्फत सुनीताला देण्यात आले आहे, ज्यांना पंतप्रधान मोदींनी अलीकडेच एका कार्यक्रमात भेट दिली होती.

नरेंद्र मोदी यांनी सुनिता विल्यम्स यांचा उल्लेख "illustrious daughter" of India असा केला आहे. दरम्यान सुनिता अमेरिकेच्या नासा अंतराळवीर असल्या तरीही त्या भारतीय वंशाच्या आहेत. नरेंद्र मोदींचं 1 मार्चचं पत्र आता भारत सरकार कडून खुलं करण्यात आलं आहे. यामध्ये मोदींनी "1.4 अब्ज भारतीयांना तुमच्या कामगिरीचा नेहमीच अभिमान वाटतो. "अलीकडील घडामोडींमुळे तुमची प्रेरणादायी दृढता पुन्हा एकदा दिसून आली आहे." असं म्हटलं आहे.  Sunita Williams Returns: सुनिता विल्यम्स चा परतीचा प्रवास सुरू; पहा कधी, कुठे उतरणार पृथ्वीवर? 

नरेंद्र मोदी यांचं सुनिता विल्यम्स साठी पत्र

2016 ला मोदी अमेरिका दौर्‍यावर गेले होते तेव्हा त्यांची सुनिता विल्यम्स सोबत भेट झाली होती. सुनिता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या हे मूळचे गुजरातच्या अहमदाबादमधल्या मेहसाना जिल्ह्यातील झुलासन गावामधील होते. अमेरिकेत दीपक पांड्या यांचा बोनी झोलोकर यांच्याशी मैत्री आणि पुढे लग्न झाले. दोघेही अमेरिकेच स्थायिक झाले.