
लंडनमध्ये (London) काम करणाऱ्या एका भारतीय महिलेने आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमधून काम करण्यास नकार दिला आहे. कोविड नंतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलावले आहे. परंतु घरातून काम करण्याची सवय लागलेले कर्मचारी आता कार्यालयात जाण्यास टाळाटाळ करत आहेत. अशात या 25 वर्षीय तरुणीने आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. तरुणीने म्हटले आहे की, ती तिच्या कष्टाने कमावलेले पैसे लंडनच्या महागड्या वाहतूक वाहनांमध्ये ऑफिसला ये-जा करण्यासाठी खर्च करणार नाही.
तीन दिवसांपूर्वी लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आणि तिची समस्या सांगितली. तिच्यामते, कार्यालयात परतल्याने खर्च वाढत आहे. ती म्हणते, 'मी ऑफिसमध्ये 5-4 दिवस काम करणार नाही. चांगली नोकरी असूनही, दरमहा आपले बिल भरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मी 25 वर्षांची आहे. तथाकथित 'चांगल्या' कारकिर्दीत आहे. लंडनमध्ये राहते, मात्र सध्याचा खर्च पाहता मला नाही वाटत मी कदाचित कधी घर घेऊ शकेन.’ अशाप्रकारे ऑफिसमधून काम करण्यास नकार देण्यामागे तिने राहणीमानाच्या उच्च खर्चाला जबाबदार धरले.
ती पुढे म्हणते, जेव्हा सर्व उच्च पदे अशा लोकांकडे असतात जे ‘निवृत्त’ होईपर्यंत हलणार नाहीत, तेव्हा करिअरची प्रगती हे एक दूरचे स्वप्न असते. वाढत्या महागाईच्या बरोबरीने पगार मिळत नसताना आपण अधिक काम का करावे?, असा प्रश्नही तिने उपस्थित केला. तिच्या पोस्टमध्ये, तिने असेही म्हटले की, आजच्या काळात, कॉर्पोरेट जगात सुविधा आणि पगाराच्या बाबतीत जनरल झेड सर्वात जास्त त्रास सहन करत आहे. आम्हाला 5-10 वर्षांपूर्वी मिळणाऱ्या पगारावर जगण्याची अपेक्षा आहे, तर महागाई 5-10 पट वाढली आहे. दुसरीकडे, जुन्या पिढीकडे घरे, बचत आणि आरामदायी जीवन आहे, परंतु आम्हाला सांगितले जाते की आम्ही ऑफिसमध्ये अधिक 'हजर' राहावे.’ (हेही वाचा: HR Manager Creates Fake Employees: कंपनीच्या एचआरने तयार केले 22 बनावट कर्मचारी, तब्बल 18 कोटी रुपये लुटले; 8 वर्षे सुरु होता प्रकार)
महिलेचे म्हणणे आहे की, लंडनमध्ये ऑफिसला जाण्याचा खर्च आधीच खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, जर काम फक्त व्हिडिओ कॉलद्वारे करता येत असेल, तर अनावश्यक प्रवासावर पैसे का वाया घालवायचे?. जुन्या पिढ्यांना मिळणाऱ्या फायद्यांवरही त्यांनी भाष्य केले. ती म्हणते, ‘आधीच्या पिढ्यांना मोफत जेवण, प्रवास परतफेड, बोनस, स्टॉक पर्याय आणि क्लायंटसोबत कॉफी मीटिंग असे फायदे मिळत होते. आता असे काहीही मिळत नाही.