बिहार मध्ये होळीचा सण मोठ्या धामधूमीत साजरा केला जातो. कालही हा रंगोत्सव तसाच साजरा करण्यात आला. यावेळी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा लेक आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव देखील होळीच्या रंगात न्हाहून निघाले होते. त्यांच्या घराजवळ आयोजित होळीच्या कार्यक्रमात त्यांनी तेज प्रताप यांनी वर्दीमध्ये असलेल्या त्यांच्या अंगरक्षक दीपक चं नाव घेत नाचायला भाग पाडलं. यावेळी तेज प्रताप स्वतः होळीचं गाणं माईक वरून गात होते. यावेळी त्यांनी 'नाच नाहीतर निलंबित करेन' अशी त्याला सार्वजनिक धमकी देखील दिली. सध्या तेज प्रताप यांचा हा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे.
तेजप्रताप यादव यांचा होळीतील व्हिडीओ वायरल
VIDEO | A policeman was seen dancing on the instruction of RJD leader Tej Pratap Yadav during at his residence in Patna. #tejpratapyadav #Holi #Patna pic.twitter.com/oCIP0kL03r
— Press Trust of India (@PTI_News) March 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)