
ठाणे (Thane Crime News) शहरात एका शेजाऱ्याने एका माणसाला क्रिकेट बॅटने क्रूरपणे बेदम मारहाण केल्याची घटना घडली आह. कुत्रा चावल्याच्या (Dog Bite Dispute) रागातून शेजाऱ्यासोबत झालेल्या वादावादीचे रुपांतर क्रूर भांडणात झाले. त्यातून उद्भवलेल्या बाचाबाचीचे रुपांतर हिंसात्मक हातापायीत झाल्याचे पोलिसांनी मंगळवारी (18 मार्च) सांगितले. कापूरबावडी पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 14 मार्च रोजी बाळकुम पाडा येथे घडली, जिथे एका 45 वर्षीय पुरूषाला पाळीव कुत्र्याने चावा घेतला. पीडित व्यक्तीने कुत्र्याच्या मालकाशी सामना केला आणि त्याला प्राण्याला नियंत्रित करण्यास सांगितले, ज्यामुळे जोरदार वाद झाला.
कुत्र्याच्या मालकाने रागाच्या भरात पीडित व्यक्तीवर क्रिकेट बॅटने हल्ला केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. पीडित व्यक्तीस तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
एफआयआर दाखल, तपास सुरू
पीडिताच्या तक्रारीनंतर, कापूरबावडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या (BNS) कलम 118(1) अंतर्गत धोकादायक मार्गाने स्वेच्छेने गंभीर दुखापत केल्याबद्दल आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
कुत्र्याने हल्ला केल्यास स्वत: बचाव कसा कराल?
कोणताही आक्रमक कुत्रा, मग तो भटका असो किंवा पाळीव. तो अंगावर आल्यास भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता:
शांत राहा आणि घाबरणे टाळा
कुत्र्यांना भीती वाटू शकते आणि जर ते तुम्हाला घाबरलेले दिसले तर ते अधिक आक्रमक होऊ शकतात. खोल श्वास घ्या आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा.
अचानक हालचाली टाळा
धावू नका, कारण यामुळे कुत्रा तुमचा पाटलाग सुरु करु शकतो. त्याऐवजी, स्थिर उभे रहा आणि अचानक हालचाली टाळा.
कुत्र्यांवर लक्ष ठेवा, त्याला नजर देऊ नका
कुत्र्यांच्या नजरेत नजर देणे टाळा, त्यावर लक्ष ठेवा आणि दोघांमध्ये संघर्ष कमी होईल यासाठी प्रयत्न करा. जवळचा आडोसा पाहा, हातामध्ये एखादी दणकट वस्तू घेऊन प्रतिकार करा. ते शक्य नसेत तर किमान तुम्ही त्यास घाबरला नाही, हे त्याच्या लक्षात आणून द्या.
किंचाळणे टाळा
कुत्र्याने हल्ला केल्यास किंचाळू नका. मोठ्या हावाजात त्याला हाकलण्याचा प्रयत्न करा. यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात मदत होऊ शकते.
अडथळा निर्माण करा
जर कुत्रा जवळ आला तर तुमच्या आणि कुत्र्याच्या मध्ये एखादी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा - ती पिशवी, काठी किंवा अगदी जाकीट देखील असू शकते.
गरज पडल्यास स्वतःचे रक्षण करा
जर कुत्रा हल्ला करत असेल, तर तुमचा चेहरा, मान आणि छातीसारख्या संवेदनशील भागांना संरक्षण द्या. स्वतःला रोखण्यासाठी किंवा बचाव करण्यासाठी तुमचे हात किंवा वस्तू वापरा.
बाहेर पडण्याचा मार्ग शोधा
कुत्र्याकडे पाठ न वळवता हळूहळू सुरक्षित ठिकाणी परत या. एकदा तुम्ही सुरक्षित अंतरावर आलात की, शांतपणे तो परिसर सोडा.
मदतीसाठी कॉल करा
जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली किंवा तुम्ही जखमी झालात, तर स्थानिक अधिकाऱ्यांशी किंवा प्राणी नियंत्रण विभागाशी संपर्क साधून ताबडतोब मदत घ्या. तयार राहिल्याने सर्व फरक पडू शकतो. जर तुम्ही भटक्या कुत्र्यांच्या परिसरात वारंवार फिरत असाल, तर पेपर स्प्रे (कायदेशीररित्या परवानगी असल्यास) किंवा अल्ट्रासोनिक डॉग रिपेलर सारखे प्रतिबंधक सोबत बाळगणे उपयुक्त ठरू शकते.