नागपूर हिंसाचारामध्ये पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुर्हाडीचे वार बसले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी जातीने त्यांची विचारपूस केली. व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरील उपचारांची माहिती घेतली तसेच त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून काल नागपूर मध्ये हिंसा भडकली. काही घरांचे, गाडीचे जाळून नुकसान करण्यात आले. काही अफवांवरून भडकलेल्या या जाळपोळीमध्ये दगडफेकही झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली व्हिडीओ कॉल वर चौकशी
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)