Coronavirus Highlights In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस, दिवसभरातील 5 ठळक मुद्दे
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Highlights In Maharashtra: राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या वाढून आता ती 25,922 इतकी झाली आहे. तर उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने 5,547 जणांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. हे सर्वजण आगोदर कोरोना व्हायरस संक्रमित होते. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्हा आणि शरहाचे नाव आहे मंबई. या शहरात राज्यातील सर्वाधिक रुग्ण आहेत. इथे कोरोना व्हायरस रुग्णसंख्येने 15 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाचे हे संकट पाहता राज्यात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. आज दिवसभरात कोरोना व्हायरस बाबतची ही महत्त्वपूर्ण माहिती.

अत्यावश्यक सेवेसाठी 3,47,522 पास

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 3,47,522 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच 2,97,282 व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कलम 188 नुसार 1,05,532 गुन्हे नोंद

महाराष्ट्र पोलिसांनी 22 मार्च ते 12 मे 2020 या कालावधीत कलम 188 नुसार 1,05,532 गुन्हे नोंद झाले असून 20,072 जणांना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 4 कोटी 5 लाख 62 हजार 494 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पुढील आदेश होईपर्यंत ग्रामसभांना स्थगिती

राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे मे महिन्यात घेणे बंधनकारक असलेली ग्रामसभा यंदा होऊ शकणार नाही.

घरपोच मद्यसेवा करण्याबाबत निर्णयाची अंमलबजावणी 15 मे 2020 पासून

कोविड -19 चा संसर्ग जगभरासह देशात आणि राज्यात वाढला असल्याने 22 मार्च 2020 पासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक वस्तुखेरीज सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र 4 मे 2020 पासून किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू काही ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. (हेही वाचा, Lockdown च्या काळात महाराष्ट्र सरकारकडून 65,000 उद्योगांना कामकाज सुरू करण्यास परवानगी; 35 हजार उद्योगांमध्ये उत्पादन सुरु- उद्योगमंत्री सुभाष देसाई)

केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी राज्याची मागणी

राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा ईद सण लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात

दरम्यान, भारतातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 74281 इतकी झाली आहे. त्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 47480 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत मृत्यू झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 2415 इतकी झाली आहे. तर उपचार घेऊन प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने देशभरातून 24386 जणांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे.