पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) नव्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन (Medical Gas Pipeline) टाकण्याचं काम केवळ 11 दिवसांत पूर्ण करण्यात आलं आहे. या विक्रमी कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं (Public Works Department) अभिनंदन केलं आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील रुग्णालय सज्ज असणं गरजेचं आहे. याचं पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात केवळ 11 दिवसांत गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम करण्यात आलं आहे. यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
साधारणत: हे काम करण्यास सार्वजनिक विभागाला 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागला असता. मात्र, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी सार्वजनिक विभागाने रात्रंदिवस एक करून गॅस पाईपलाईन बसवण्याचं काम पूर्ण केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात 221 कोरोना बाधित रुग्णांची वाढ तर 22 जणांचा मृत्यू; राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली)
The Public Works Department completed the challenging task of installing a medical gas pipeline system in just 11 days at the special hospital of Corona, which is being started in the new building of Sassoon, Pune.
A MNC Atlas Copco said it is a world record.#FightAgainstCorona pic.twitter.com/4pjHTrAtLo
— Ashok Chavan (@AshokChavanINC) April 12, 2020
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ससून रुग्णालयाची 11 मजली इमारत बांधून पूर्ण झाली होती. मात्र, कोरोनाचे संकट आल्याने या इमारतीत अतिदक्षता व विलगीकरण कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम बाकी होतं. त्यामुळे राज्यापुढील आव्हान लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम सोपवण्यात आलं, असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने 5 ते 6 महिने काळावधी लागणारे काम केवळ 11 दिवसांत पूर्ण केलं आहे. सार्वजनिक विभागाच्या या कामावर अॅटलास कॉप्को या बहुराष्ट्रीय कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे. द्रवरूपी ऑक्सिजन वायूत रुपांतर करुन पुरवठा करण्याचं काम इतक्या कमी वेळेत पूर्ण करण्याचा हा जागतिक विक्रम असल्याचं अॅटलास कॉप्को कंपनीने म्हटलं आहे.