Coronavirus: महाराष्ट्रात (Maharashtra) आज 221 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली आहे. यापैकी 217 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज राज्यात 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे.
याशिवाय देशात आज 900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 8,447 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 273 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Lockdown: पटियाला येथे बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजीत सिंग यांच्यावर 7 तासांनंतर यशस्वी शस्त्रक्रिया)
221 new COVID19 cases & 22 deaths reported in the state today; the total number of COVID19 cases in the state now stands at 1982: Maharashtra Health Department pic.twitter.com/ezOohAUqHv
— ANI (@ANI) April 12, 2020
राज्यात आज २२१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १९८२ अशी झाली आहे. यापैकी २१७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 12, 2020
महाराष्ट्रात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज नवे 217 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1399 वर पोहचला असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबई तसेच उपनगरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.