ASI Harjeet Singh's (PC - Twitter)

Lockdown: पटियाला (Patiala) येथे बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजीत सिंग (ASI Harjeet Singh) यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली आहे. हरजीत सिंग यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास 7 तास 5 तासांचा अवधी लागला. सध्या हरजीत सिंग यांची प्रकृती चांगली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी यासंदर्भात माहिती देताना डॉक्टरांचे आभार मानले असून हरजीत सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आज लॉकडाऊन काळात पंजाब राज्यातील पटीयाला (Patiala) येथे बंदोबस्तावर असलेल्या हरजीत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. (हेही वाचा - Lockdown: बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा तलवारीने तोडला हात; पंजाब राज्यातील पटियाला येथील घटना)

या घटनेनंतर हरजीत सिंग यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हरजीत यांच्यावर अनुभवी डॉक्टरांचे एक पथक उपचार करत होते. गेल्या 7 तासांपासून त्यांच्या हाताची शस्त्रक्रिया सुरू होती. त्यानंतर आता हरजीत यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

हरजीत लॉकडाऊन काळात बंदोबस्तावर होते. यावेळी हल्लेखोर लोक हे संचारबंदी दरम्यान, रस्त्यावर आले होते. त्यांच्याकडे पोलिसांनी संचारबंदी काळात फिरताना आवश्यक असणारा पास मागितला. तेव्हा सुरक्षारक्षकांचे तडे तोडून हे लोक पळू लागले. त्यानंतर त्यांच्यातील काही लोकांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यात हरजीत यांचा हात तोडण्यात आला होता तर इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांरी गंभीर जखमी झाले होते.