ASI Harjeet Singh | (Photo Credits-ANI)

लॉकडाऊन (Lockdown) काळात पंजाब (Punjab) राज्यातील पटीयाला (Patiala) येथे बंदोबस्तावर असलेल्या पंजाब पोलिसांवर आज (12 एप्रिल 2020) आज मोठा हल्ला झाला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार निहांग समूदाय (Nihang Group) संबधीत असलेल्या काही लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहाय्यक उपनिरीक्षक हरजीत सिंह (ASI Harjeet Singh) यांचा हात तोडण्यात आला. निहांग समूदयाशी संबंधित लोक हे शिख सांप्रदायाचे असतात. त्यांच्याकडे पारंपरीक हत्यार नेहमीच असते.

पंजाब पोलिसांवर झालेल्या या धक्कादायक हल्ल्याबाबत Director General of Police (DGP), Punjab, दिनकर गुप्ता यांनी सांगितले की, मी PGI डायरेक्टर यांच्यासोबत चर्चा केली आहे. जखमी एएसआयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अनुभवी डॉक्टरांचे एक पथक उपचार करत आहे.

पटीयालाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक, मंदीप सिंह सिंधू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हल्लेखोर लोक हे संचारबंदी दरम्यान, रस्त्यावर आले होते. त्यांच्याकडे पोलिसांनी संचारबंदी काळात फिरताना आवश्यक असणारा पास मागितला. तेव्हा सुरक्षारक्षकांचे तडे तोडून हे लोक पळू लागले. त्यानंतर त्यांच्यातील काही लोकांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. (हेही वाचा,तेलंगाना: RSS स्वयंसेवक हातात काठी घेऊन तापसत होते नागरिकांचे ओळखपत्र; ट्विटर युजर्स व्यक्त करताहेत संताप )

एएनआय ट्विट

हल्लेखोरांनी हल्ल्यात एएसआयचा हात तोडला. हल्लेखोरांनी इतरही दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केले आहे. या घटनेनंतर जखमी एएसआयना चंडीगढ येथील PGIMER रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हल्लेखोर पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, पंजाबच्या स्पेशल चीफ सेक्रेट्रीने माहिती दिली आहे की, 7 हल्लेखोरांना पकडण्यात आले आहे. हे सर्व हल्लेखोर बालबेरा गावचे आहेत. ते एका गुरुद्वारामध्ये लपून बसले होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात एका निहांगला गोळी लागून तो जखमी झाला. जखमी निहांगला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पंजब सरकारनेही घटनेचे गांभीर्य ओळखून लॉकडाऊन वाढवला आहे. पंजाबमधील लॉकडाऊन 1 मे पर्यंत असणार आहे. लॉकडाऊन काळात कोणत्याही नागरिकास रस्त्यावर येण्यास मनाई आहे.