RSS Volunteers | (Photo Credits: Twitter/@friendsofrss)

लॉकडाऊन (Lockdown) काळात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे काम पोलिसांचे. इतर कोणा संस्था अथवा संघटनेचे नाही. तरीही हातात काठी घेऊन रस्त्यांवर उतरलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) कार्यकर्त्यांचे एक छायात्रित पाहून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सांगितले जात आहे की, हे आरएसएस (RSS) कार्यकर्ते रस्त्यांवर उतरुन लोकांचे ओळखपत्र तपासत होते. द हिंदू वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. आरएसएस कार्यकर्त्यांची ही छायाचित्रे तेलंगाना (Telangana) राज्यातील बीबीनगर येथील गुदूर चेकपोस्ट जवळ गुरुवारी घेतलेली आहेत. यात रास्वसं कार्यकर्ते आपल्या गणवेशात रस्त्यावर उभे होते. रस्त्यावर लावलेलेल्या बॅरिकेट पार करताना हे लोक नागरिकांचे ओळखपत्र आणि इतर काही कागदपत्रं तपासत होते.

दरम्यान, अनेक युजर्सनी ही छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे शेअर करत या मंडळींना हा अधिकार कोणी दिला? असा सवाल ट्विटर युजर्स विचारत आहेत. ‘@friendsofrss’ नावाच्या एका ट्विटर हँडलवर ही छायाचित्रे ट्विट केली होती. या हँडलवरील ट्विटमध्ये दावा करण्यात आले आहे की, आरएसएसचे लोक पोलिसांची मदत करत आहेत.

ट्विट

तेलंगानाचे पोलिस महासंचालक एम. महेंद्र रेड्डी आणि Rachakonda पोलिस कमिशनर महेश भागवत यांनी द हिंदूला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, 'मला घटनेबाबत माहिती मिळाली आहे. माझ्याकडेही ते फोटो आले आहेत. ते (आरएसएस कार्यकर्ते) आमच्याकडे आले होते. आम्हाला ते वॉलेंटियर करण्यासाठी विचारत होते. मात्र, आम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही. आम्ही कोणत्याही धार्मिक अथवा राजकीय संस्था, संघटनेची मदत न घेण्याचे ठरवले आहे.' (हेही वाचा, स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा 'संघ' परिवार कोठे होता? सावरकर मुद्द्यावरुन शिवसेनेचा रोखठोक सवाल)

ट्विट

ट्विट

या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना वकील एल रविचंदर यांनी द हिंदूशी बोलताना सांगितले की, 'जर तुम्ही प्रशासनात सहभागी नाही आहात. आणि तरीदेखील असे करत आहात तर हा मुलभूत हक्कांचा भंग आहे. अशा प्रकारे कायदा हातात घेण्याची कोणाला परवानगी मिळू शकत नाही. जर पोलीस कर्मचारी छायाचित्रात दिसत आहेत तर ती कायदा आणि सुव्यवस्थेचे अपयश आहे.'