महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्य सरकारकडून अनेक योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. मुंबईत कोरोना प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढू लागला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोरेगाव (Goregaon), महालक्ष्मी (Mahalakshmi), मुलुंड (Mulund), दहिसर (Dahisar), भायखळा (Byculla) येथे कोविड सेंटर (Covid19 Center) उभारणीचे काम जोरात सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत येत्या आठवडाभरात सुमारे 8 हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाबाधित रुग्णांपैकी निम्म्यांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबई शहरात सापडले आहेत. मुंबई कोरोना विषाणूचा अधिक प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील वानखेडे मैदान ताब्यात देण्याची विनंती एमसीएकडे केली होती. मात्र, मान्सून तोंडावर आहे. त्यामुळे वानखेडे मैदान क्वारंटाइन केंद्रासाठी योग्य नाही, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता महत्वाचा वाटा उचलत आहे. तसेच लवकरच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू, असा विश्वासही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे देखील वाचा- Unlock 1: भारतातील कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाउन कायम; अत्यावश्यक सेवा सुरु
ट्वीट-
#कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत येत्या आठवडाभरात सुमारे ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार .
गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे- आरोग्यमंत्री श्री @rajeshtope11 यांची माहिती #MaharashtraFightsCorona pic.twitter.com/NBrq0pvM0w
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) May 30, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.