Narendra Modi(photo Credits: ANI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन घोषणा केली होती. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने देशात 31 मेपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो 3 मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत कायम ठेवण्यात आला होता. मात्र, कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट बनत चालल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या 5 व्या टप्प्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहेत. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचे पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे देखील वाचा- मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे नवे 18 रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाल्याने COVID19 रुग्णांचा आकडा 1733 वर पोहचला

ट्वीट- 

कोरोनाचे संकट पाहता पाचव्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात मेट्रो, सिनेमागृह बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच राजकीय, समाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.