Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; पुणे, नाशिक, नांदेड येथे पारा एकांकी संख्येवर घसरला, पाहा आजचे तापमान
Cold Wave in Maharashtra | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यभरात थंडीचा कडाका (Cold Wave in Maharashtra) वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढचे एकदोन दिवस राज्यात थंडीची लाट येऊ शकते. अशा स्थितीत राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात ( Temperature in Maharashtra) घट होऊन पारा खाली जाऊ शकतो. दरम्यान, राज्यभरात आज (मंगळवार, 12 डिसेंबर 2020) अनेक ठिकाणी पारा घसरला असून, तो एकांकी संख्येवर पोहोचला आहे. प्रामुख्याने पुणे, बारामती, निफाड, परभणी येथे तापमान मोठ्या प्रमाणावर घसरले आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय बदल पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी हवामान ढगाळ राहिले. त्यामुळे म्हणावे तितक्या प्रमाणात राज्यात थंडी जाणवली नाही. परंतू, राज्यातील ढगाळ वातावरण जसजसे कमी होऊ लागले तसतसे थंडीचे प्रामा वाढू लागले. प्रामुख्याने उत्तर भारतात थंडीचे प्रामाण मोठे आहे. हिच थंडी आता महाराष्ट्राकडेही सरकू लागली आहे. त्यामुळे राज्यात तापमान घसरल्याचे पाहायाल मिळते आहे. (हेही वाचा, Maharashtra Winter: महाराष्ट्र राज्यात पुढील 2 दिवसामध्ये 2-3 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये घट होण्याची शक्यता; IMD चा अंदाज)

राज्यातील आजचे (22 डिसेंबर) तापमान (अंश सेल्सीयसमध्ये)

  • परभणी - 7.6
  • जालना- 1.8
  • नांदेड- 9.9
  • बीड-10.1
  • जेऊर- 8
  • उस्मानाबाद- 11.4
  • पुणे- 8.1
  • बारामती- 8.6
  • नाशिक- 8.4
  • सांगली- 12.6
  • जळगाव- 9
  • मालेगाव- 10.2
  • सोलापूर- 12.1
  • कोल्हापूर- 14.5
  • सातारा- 9
  • ठाणे- 18
  • रत्नागिरी- 18.9
  • गोंदीया- 7.8
  • नागपूर- 8.6
  • अकोला- 9.6

दरम्यान, राज्यात आज सर्वाधिक कमी तापमान निफआड येथे नोंदवण्यात आले. निफाड येथे 6.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. 7.6 अंश सेल्सिअस तापमानावर परभणी दुसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळाली. यासोबतच ठाणे, पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नागपूर, आदी ठिकाणीही थंडी मोठ्याप्रमाणावर असल्याचे जाणवत आहे.