Cold | Photo Credits: PTI

महाराष्ट्रात यंदा डिसेंबर महिना संपायला आला तरीही थंडीची चाहूल लागलेली नाही. राज्यात काही ठिकाणी धुकं आणि हवेत जाणवायला सुरूवात झाली आहे पण उत्तर भारताच्या तुलनेत थंडीचे दिवस सुरू झालेले नाहीत. पण राज्यात थंडी जाणवण्यासाठी येत्या काही दिवसांत पुरक हवामान असल्याचं चित्र आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 2-3 दिवसांत राज्यात पारा घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा 4 डिग्री पर्यंत तो वाढू शकतो. वातावरणात थंडावा जाणवण्यासोबतच हवेत ह्युमिडीटी वाढत असल्याने अनेक ठिकाणी सकाळ ही धुक्याच्या चादरीमध्ये होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक मध्ये मागील आठ्वड्यात काही काळ हवेत गारवा जाणवत होता.

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच हवमानात मोठे बदल जाणवायला सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस देखील बरसला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात 5.1 डिग्री सेल्सियस पर्यंत घसरण पहायला मिळाली तर कोकण, गोवा किनारपट्टीवर हीच घसरण 3.1 ते 5 डिग्रीपर्यंत पहायला मिळाल्याने वातावरण गार होते.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात किमान तापमानात सामान्य तापामानापेक्षा 5 डिग्री अधिक तापमान आहे. उत्तर भारतामध्ये थंडीचा पारा चढा आहे. हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालॅन्ड, त्रिपुरा या भागामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये धुकं दाट आहे.