काल संध्याकाळी पुण्यातील (Pune) कात्रज (Katraj) जवळ राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  पुणे (Pune) दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदे हे पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे (Dagdushheth Ganpati) दर्शन घेणार होते. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात असताना ठाकरेंच्या समर्थकांनी (Thackeray Supporters) सामंतांच्या गाडीचा ताफा बघताच मोठ्या संख्येने त्यांच्या गाडीवर हल्ला करत दगडफेक केली. यावेळी 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजीही करण्यात आली. परिसरात मोठा गदारोळ माजला होता. या हल्ल्यात गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे तसेच जखमीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

या संपूर्ण प्रकारावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (CM Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर झालेला हल्ला हे भ्याड कृत्य आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी आहे. ते बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच संबंधीत प्रकारावर खुद्द उदय सामंत यांनी देखील त्यांची पहिली प्रतिक्रीया दिली आहे. (हे ही वाचा:- Devendra Fadnavis and Ajit Pawar: उपमुख्यमंत्र्याकडून अजित पवारांना खास गिफ्ट, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांच्या मैत्रीची पुन्हा एकदा चर्चा)

 

उदय सामंत यांनी त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन (Twitter Account) ट्वीट (Tweet) केल आहे की गद्दार म्हणता तरी शांत आहे,शिव्या घालता तरी शांत आहे,आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत (Democracy) विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही.अशी प्रतिक्रीया उदय सामंत यांनी दिली आहे. तर या सर्व बाबींना काळच उत्तर आहे, आमचा अंत पाहू नका अशी परखड भुमिका मांडत ठाकरे समर्थकांना उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.