चंद्रपूर महापालिका, मूल नगरपरिषद पोटनिवडणूक निकाल 2019: भाजपला धक्का, काँग्रेसला एका जागेवर विजय
काँग्रेस विरुद्ध भाजप | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Chandrapur and Mul Municipal Corporation By Election Result 2019: चंद्रपूर महापालिका आणि मूल नगरपरिषदेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपला काहीसा धक्का तर काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक कही खूशी कही गम अशी पाहायला मिळाली. प्रामुख्याने चंद्रपूर महापालिकेसाठी दोन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. यात एका ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी भाजप विजयी ठरली. दोन्ही जागांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान पार पडले होते. प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर महापालिकेत प्रभाग क्रं. 6 मध्ये काँग्रेसच्या कलावती यादव विजयी ठरल्याच तर प्रभाग क्र. 13 मध्ये भाजपचे प्रदीप किरमे विजयी ठरले. अर्थात चंद्रपूर महापालिकेत आगोदरपासून भाजपचीच सत्ता आहे. पोटनिवडणुकीत आता एका जागेची वाढ झाली इतकेच.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या मूल नगरपरिषद पोटनिवडणुकीत मात्र भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 6 साठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजप (BJP) उमेदवार शिल्पा रामटेके यांचा पराभव झाला. तर काँग्रेस (Congress) उमेदवार ललिता फुलझेले (Lalitha Fulzele) यांचा विजय झाला. ललिता फुलझेले यांनी शिल्पा रामटेके यांचा 176 मतांनी पराभव केला. (हेही वाचा, चंद्रपूर: प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी)

नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या  अशा नगरपरिषद पोटनिवडणुकीत पराभव म्हणजे भाजपला धक्का म्हणून ओळखला आहे. विशेष म्हणजे हा धक्का अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मूल नगरपरिषद ( Mul Municipal Council) पोटनिवडणुकीत बसला आहे.