सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. खडवली रेल्वे स्थानकात रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 35 ते 40 मिनिटे विलंबाने सुरु आहे. यामुळे ऐन कामाला जाणाऱ्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात सध्या अतिशय गर्दी आहे. (लोकल रेल्वेचे तिकिट दर वाढण्याचे संकेत)
तातडीने याची दखल घेत दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. तसंच लवकरच वाहतूक सुरळीत होईल, असे सांगण्यात येत आहे. काल बुधवारी (5 जून) रोजी डोंबिवली स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.
कालच्या तांत्रिक बिघाडानंतर आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या प्रवाशांना वाहतूक विस्कळीत झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.