डोंबिवली (Dombivali) रेल्वे स्थानकाजवळ काही तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मध्य रेल्वे मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटांनी उशिराने धावत आहे. त्यामुळे ऐन कामाला जायच्या वेळेस प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच जलद मार्गावरील लोकल गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. मात्र आज रमजान असल्यामुळे लोकलमध्ये गर्दी फार थोड्या प्रमाणात आहे. परंतु वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.