IP Indicator for Mumbai Local: मुंबई लोकल रेल्वे कधी येणार यासाठी फलाटावर वाट पाहात असताना अपवादानेच त्याबाबत अचुक माहिती मिळते. अनेकदा तर रेल्वे स्टेशन (Mumbai Local Timetable) फलाटावर असलेल्या इंडिकेटरवर पुढच्या 10 मिनीटात रेल्वे स्थानकात प्रवेश करणार असे दिसते. प्रत्यक्षात रेल्वे फलाटावर आलेली असते. अनेकदा डाऊन मार्गावरुन जाताना रेल्वे अप मार्गाची स्टेशन्स दिसतात. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ होतो. हा गोंधळ टाळण्यासाठी लवकरच नवी यंत्रणा सक्रीय केली जाणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या तक्रारी आणि अडचणींची दखल घेत आयपी आधारीत इंटिकेटर प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता प्रवाशांना लोकल रेल्वेची वेळ अचूक पद्धतीने कळणार आहे.
मध्य रेल्वेचा फलाटांवरील इंडिकेटरची अचूकता तपासण्याचा निर्णय
प्रवाशांच्या तक्रारीवरुन मध्य रेल्वेने फलाटांवरील इंडिकेटरची अचूकता तपासण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नऊ रेल्वे स्थानके निवडण्यात आली. त्यानुसार कुर्ला, घाटकोपर, दादर, भायखळा, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड, ठाकुर्ली आणि दिवा या ठिकाणचे जवळपास 25% इंडिकेटर हे सदोष असून अचुक वेळ दाखवत नसल्याचे दिसून आले. मात्र, उर्वरीत 75% इंडिकेटर लोकलची वेळ अचूक दाखवत असल्याचेही पुढे आले.
ट्रेन मॅनेजमेंट (टीएसएम) यंत्रणेचा वापर
विद्यमान स्थितीमध्ये मुंबई रेल्वे स्थानकांवर लोकलची वेळ दर्शविण्यासाठी ट्रेन मॅनेजमेंट (टीएसएम) यंत्रणा वापरली जाते. ही तंत्रज्ञान प्रणाली 2008 मधील आहे. त्यात सुधारणा करुन रेल्वेने आयपी आधारीत यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे टीएसएम तंत्रज्ञान
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, TCM तंत्रज्ञानात माहितीचा संग्रह केला जातो. जो इंडीकेटरवर पोहोचविण्यात येतो. त्या आधारे लोकल ट्रेन वेळेची अचूकता साधता येते. या तंत्रज्ञानामध्ये प्रत्येक इंडिकेटरला स्वतंत्र क्रमांक देण्यात येतो. तसेच, इंडिकेटर ऑप्टिकल फायबरणे जोडण्यात येतो. परिणामी विनाअडथला आणि कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण न होता प्रवाशांना वेळेबाबत अचूक माहिती उपलब्ध होते.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते कल्याण रेल्वे मार्गांदरम्यान जवळपास 26 स्टेशन्स आहेत. त्यावरील 92 फलाटांवरील इंडिकेटरवर सध्या टीएसएस प्रणाली वापरली जाते. मात्र, त्यात प्रवाशांना अचूक माहिती मिळतेच असे नाही. त्यामुळे नव्या प्रणालीद्वारे ती सेवा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.