मुंबई: फलाटावरील गर्दी आणि तिकीट तपासणीस (| (Photo courtesy: archived, edited, symbolic images))

महाकाय गर्दी आणि त्यातच रेल्वेचे सतत कोलमडणारे वेळापत्रक यांमुळे आगोदरच हौराण असतात. त्यातच तोतया तिकीट तपासणीसांचा रेल्वे फलाटांवर वावर वाढल्याने मुंबईकर प्रवाशांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. अशा या तोतया तिकीट तपासणीसांकडून (Fake Railway Ticket Checker) विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्रास लुट होत आहे. असा तोतया तिकीट तपासणीसांना चाप लावण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. या तोतया तिकीट तपासणीसांना चाप लावण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) रेल्वे स्थानकांसह तिकीट तपासणीस कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही यंत्रणा कर्यन्वीत झाल्यानंतर या तोतयांना अटकाव होणार तर आहेच पण, मुंबईकरांचीही लूट थांबणार आहे.

खरे तर प्रामाणिकपणे नियमीत तिकीट काढूनही अनेक प्रवाशांना रेल्वेमध्ये बसणे तर दुरच पण निटसे चढायला आणि उतरायलाही मिळत नाही. त्यातच अनेक मंडळी विनातिकीट प्रवास करत असतात. रेल्वेच्या जनरल आणि प्रथमवर्ग डब्यात विनातिकीट प्रवास करणारी मंडळी सर्रास आढळतात. पण, रेल्वेचे तिकिट तपासणीस डब्यांमध्ये चडून प्रवाशांचे तिकीट तपासण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे. कधीमधी रेल्वे फलाट आणि पुलांवर हे तिकीट तपासणीस तुरळक प्रमाणात दिसतात. त्यामुळे प्रामाणिक प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला नेहमीच लाखोली वाहिली जाते. (हेही वाचा, दादर रेल्वे स्टेशनमध्ये महिलेची फलाटावरच प्रसूती)

तोतया तिकीट तपासणीस हा रेल्वे प्रवाशांसाठी एक डोकेदुखीच आहे. कारण, अनेकदा तिकीट असतानाही प्रवाशांना कायद्याचा धाक दाखवला जातो. काही प्रकरणात त्यांना कार्यालयातही आणले जाते. त्यांच्याकडून पैसे वसुली केली जाते. अनेक नेटीझन्सनी हे प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करुन सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीसही आणले आहेत. वांद्रे रेल्वे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्यांची नोंदही झालेली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन अशा तिपासणीसांवर बारीक नजर ठेवणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, उपनगरीय विभागात सद्यस्थितीत २, ८१५ सीसीटीव्ही आहेत. तसेच १६ लोकलमधील ५० बोगींमध्ये २५१ सीसीटीव्ही आहेत. तर, महिला डब्यांतील सुमारे 73 सीसीटीव्हींची जागा सुरक्षेच्या कारणास्तव बदलण्यात आली आहे.