महाराष्ट्र ही प्रतिभासंपन्न लोकांची भूमी आहे. समाजाला घडवण्यामध्ये इथल्या साहित्यिकांचाही मोठा वाटा आहे. कविवर्य नारायण सुर्वे (Narayan Surve) यांच्या पश्चात त्यांच्या घरी चोरी झाल्यानंतर घडलेला प्रकार त्याचाच प्रत्येय देणारा आहे. नारायण सुर्वेंच्या नेरळच्या घरात चोरी केलेल्याने त्याला आपण कुठे चोरी केली याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे हृद्यांतर झाल्याची घटना समोर आली आहे. माफी ची चिठ्ठी लिहून त्याने भिंंतीवर चिकटवल्यानंतर हे प्रकरण प्रकाशझोकात आलं आहे.
नारायण सुर्वे यांच्या रायगड मधील नेरळ च्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या घरात त्यांची लेक सुजाता आणि जावई गणेश घारे राहतात. 10 दिवसांसाठी ते विरारला गेले होते. यावेळी चोराने कुलूप तोडत घरावर डल्ला मारला. त्यामध्ये त्याने एलईडी टीव्ही सह अनेक मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या.
नारायण सुर्वे यांचे 16 ऑगस्ट 2010 मध्ये निधन झाले आहे. त्यांच्या कविता प्रामुख्याने शहरी भागातील कामगार वर्गाचं दु:ख, संघर्ष अधोरेखित करणार्या आहेत. नारायण सुर्वेंच्या पश्चात त्यांची मुलगी आणि पती आता त्यांच्या घरात राहतात. हे दोघेही मुलाकडे विरारला गेले होते. घर बंद असल्याचं बघून त्यांच्या घरातील एलईडी टीव्ही आणि अन्य वस्तू चोराने लंपास केल्या होत्या. दुसर्या दिवशी पुन्हा काही वस्तू घेण्यासाठी तो तेथे गेला असता त्याने कविवर्य नारायण सुर्वे यांचा फोटो पाहिला आणि आपण कुठे आलोय, काय करतोय याचं त्याला भान आलं. त्याक्षणी त्याने 'माफी'ची चिठ्ठी तेथे ठेवली. सोबत चोरी केलेल्या वस्तू देखील परत केल्या.
सुजाता आणि त्यांचे पती रविवारी घरी पुन्हा आल्यानंतर त्यांना ही चिठ्ठी भिंतीवर दिसली. त्यांनी नंतर ही बाब पोलिसांना कळवली. TOI च्या वृत्तानुसार, नेरळ पोलिस स्टेशनचे इन्सपेक्टर शिवाजी ढवळे यांनी या घटनेचा तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. सध्या टीव्ही आणि अन्य वस्तू वरील हाताचे ठसे घेऊन त्यावरून काही सुगावा लागतो का? यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Nashik Robbery: भरदिवसा व्यापाऱ्याला लुटले, सहा लाख रुपये घेऊन फरार, विंचूर येथील घटना CCTV कैद .
View this post on Instagram
नारायण सुर्वे नावारूपाला येण्यापूर्वी त्यांचे जीवन आव्हानंं संघर्ष यांनी भरलेले होते. ते मुंबईच्या रस्त्यावर अनाथ म्हणून वाढले. घरगुती मदतनीस, हॉटेल डिशवॉशर, बेबीसिटर, पाळीव कुत्र्याची काळजी घेणारा, दूध विकणारा, कुली आणि गिरणीत काम करून त्यांनी संसाराचा गाढा ओढला होता. नारायण गंगाराम सुर्वे यांच्यावर मार्क्सवादी विचाराचा पगडा होता. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजात परिवर्तनाच्या कविता रचल्या आहे. ते पद्मश्री पुरस्कार सन्मानित कवी होते.