Nashik Robbery: चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. भरदिवसा नाशिकमध्ये चोरी झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. नाशिक शहरातीला विंचूर येथे ही घटना घडली आहे. दुचाकीवरून दोन जण आले आणि कांदा व्यापाऱ्याची पैशाची बॅग लंपास केली. दोन्ही चोरट्यांनी सिनेस्टाईलने चोरी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा- मालमत्तेच्या वादातून नातेवाईकांनी महिलेला जिवंत गाडलं; गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १ जून रोजी विंचूरमध्ये श्रीराम चौकात पोलिस ठाण्यासमोर ही घटना घडली आहे. कांदा खरेदीचे शेतकऱ्यांचे पेमेंट अदा करण्यासाठी व्यापाराने बॅंकेतून पैसे काढले होते. एकूण सहा लाख रुपये त्यांनी आपल्या बॅंकेतून काढली. हातात पैशांचे बॅग पाहून चोरट्यांनी व्यापाराकडे धाव घेतली. त्यांच्याकडून बॅग हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. व्यापाराने चोरट्यांचा पाठलाग केला परंतु ते हाती लागले नाही. चोरटे दुचाकीवरून फरार झाले.
विंचूरला भर दिवसा कांदा व्यापाऱ्याला लुटले, सहा लाख रुपये घेवून चोरट्यांचा पोबारा pic.twitter.com/HWfUcK6tN6
— sportymind (@sportymind0179) June 2, 2024
चोरीची घटना व्यापाराने लासलागावातील पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याप्रमाणे, रस्त्यावर लोकांची गर्दी आहे. याच गर्दीचा फायदा घेत दोन चोरट्यांनी व्यापाराचे पैसे चोरले.