theives PC Pixabay

Buldhana News: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात भरदिवसा चोरी झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे घडली. चोरट्यांनी बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून 9 लाख रुपयांची रोकड चोरली आहे. ही घटना शुक्रवारी (16 फेब्रुवारी) सांयकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा- रेल्वेत नोकरीच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक;

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चारच्या सुमारास मेहकर बस स्डॅंटवरून पैश्यांची चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी संतोष लद्दड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला, अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बस स्डॅंटच्या जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. घटनेनंतर परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

सीसीटीव्ही फुटेजद्वारा आरोपींचा शोध सुरु आहे. संतोष यांनी स्टेट बॅंकेतून ९ लाख रुपयांची रोकड काढली होती. ही रोकज घेऊन ते घरी परतत होते. दरम्यान संतोष हे देऊळगाव माळी येथील एका हॉटेलवर मित्रासोबत थांबले. चहा पिण्यासाठी ते पाच ते दहा मिनीट थांबले होते. त्यावेळी दोन अज्ञात चोरटे बाईकवरून तिथे आले आणि कारजवळ येऊन तोडफोड करण्यास सुरु केली. काही क्षणातच कारमधून ठेवलेली ९ लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळवली आणि फरार झाले.

थोड्यावेळाने संतोष कार जवळ आले आणि कारची अवस्था पाहून हैराण झाले. कारमध्ये पाहताच, पैश्याची बॅग पळवून नेली असा लक्षात येताच त्यांना घाम फुटला. ही संपुर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाली. तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.