Pune Crime: डंझो कंपनीचे कपडे परिधान करून चोरट्याने घरातून चोरले मौल्यवाना वस्तू,पुण्यातील घटना
Thief | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Pune Crime: स्वीगी डिलीव्हरी बॉयने नुकतेच महागडे शुज चोरल्याची घटना ताजी असताना पुण्यात देखील एक अशीच घटना घडली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे एका उच्चभ्रू इमारतीत चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. डंझो या कंपनीतील डिलिव्हरी बॉयच्या वेशात आलेल्या दोन चोरट्यांनी निर्लज्जपणे घरात घुसून मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ही घटना समोरच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीमध्ये 3 एप्रिल रोजी रात्री 8:20 च्या सुमारास ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन चोर डंझो कंपनीचे कपडे परिधान करून आले आहे.हातात पार्सल देखील आहे. इमारतीत आल्यानंतर घरातल्या काही मौल्यवान वस्तू चोरून नेताना दिसत आहे.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर घरमालकांनी सोसायटीत या घटनेची माहिती दिली. चोरांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या फुटेज तपासून चोरांचा शोध घेत आहे. पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.