Uttar Pradesh Crime: सोनसाखळी हिसकावून चोरटे फरार, दोघांवर गुन्हा दाखल, घटना CCTV कैद
Uttar Pradesh PC TW

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटे भरदिवसा रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेची सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर दोघे ही घटनास्थळावरून फरार झाले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.  गेल्या काही दिवसांपासून परिसरात चोरीची घटना वाढत आहे त्यामुळे नागरिक एकीकडे संताप व्यक्त करत आहे. (हेही वाचा- वर्दीत रिल शूट करणं पडलं महागात, दोन पोलिस निलंबित, एकावर गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वसुंधरा गाझियाबादच्या इंदिरापूरमध्ये घडली. ही संपुर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना 5 जुलै रोजी शुक्रवारी घडली. हा व्हिडिओ SachimGuptaUP या वापरकर्त्यांने एक्सवर पोस्ट केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोघे जण बाईकवरून आले आणि वेळ साधत महिलेच्या गळ्यातील सोळसाखळी हिसकावली आणि तेवढ्यात महिलेचा तोल गेला आणि ती खाली पडली.

चोरटे दुचाकीवरून आले आणि चैन चोरून वेगात पळत सुटले. त्यामुळे महिला त्यांना पकडू शकली नाही. महिलेने तात्काळ त्याच दिवशी पोलिसांना गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांना आरोपीची अद्याप ओळख पटली नाही.