Uttar Pradesh Reels: वर्दीत रिल शूट करणं पडलं महागात, दोन पोलिस निलंबित, एकावर गुन्हा दाखल
Reels Video PC TW

Uttar Pradesh Reels: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे दोन पोलिस उपनिरिक्षकांनी वर्दीवर रिल शूट करणं महागात पडलं आहे. दोन्ही पोलिसांनी एका प्रोपर्टी डिलर्ससह इन्स्टाग्रामचे व्हिडिओ शूट केले आहे. यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर दोन्ही पोलिसांना कामातून निलंबित करण्यात आले आहे. (हेही वाचा- चालत्या दुचाकीवर रील बनवताना अपघातात तरुणाचा मृत्यू; धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार,  इन्स्टाग्रामच्या व्हिडिओमुळे दोन पोलिसांना नोकरीतून निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर प्रॉपर्टी डिलर्सवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पोलिस वर्दी परिधान करून इन्स्टाग्रामचं रिल शूट करताना दिसत आहे. युपी पोलिस अश्या काही घटनांवर निर्बध घातल असल्याचे निर्देश देत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. सरताज असं प्रॉपर्टी डिलर्सचे नाव आहे. त्याला युपी पोलिसांनी अटक केले आहे.

पाहा व्हिडिओ 

धर्मेंद आणि रितेश या दोघांना पोलिस खात्यातून निलंबित केले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दिल्ली आणि डेहराहून येथील मोकळ्या रस्त्यावर दोन महागड्या कार उभ्या आहेत. कारच्या जवळच प्रॉपर्टी डिलर आणि एक पोलिस अधिकारी हस्तादोंलन करताना दिसतात. तेवढ्यात दुसरा पोलिस अधिकारी येतो. गाझियाबाद येथील लोणी परिसरात हा व्हिडिओ शूट केला आहे. सरताज यांचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. यापूर्वी देखील तिघांचे पोलिस वर्दीवर व्हिडिओ आहेत.