
बुलढाणा (Buldhana) येथे ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात 12 मजूरांचा मृत्यू झाला आहे. या ट्रकमधून एकूण 15 मजूर प्रवास करत होते. आज दुपारी सुमारे 12 वाजता हा अपघात सिंदखेडराजा-मेहकर रोडवरील (Sindkhedraja-Mehkar Road) ताडेगाव फाटा (Tadegaon Phata) येथील दुसरबीड (Dusarbid) गाव येथे झाला. हे मजूर कामासाठी नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेसवे (Nagpur-Mumbai Samruddhi Expressway) वरुन प्रवास करत होते. (मुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात ट्रक ची बाईक, बेस्ट बस धडकेत 2 जण जखमी; MIDC police कडून गुन्हा दाखल, पहा अपघाताचा थरारक क्षण)
या टिप्पर ट्रकमध्ये कामासाठी लागणारे स्टीलही वाहून नेले जात होते. ट्रक भरधाव वेगात असताना रस्त्यातील खड्डयामुळे तो पलटला. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती बुलढाणाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिली. डंपरमधील मजुरांच्या अंगात सळई पाठीत घुसल्याने आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Madhya Pradesh: स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीवेळी अपघात, 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल)
ANI Tweet:
Maharashtra: A tipper truck, carrying 15 labourers, overturns in Buldhana. Casualties and injuries feared. Details awaited. pic.twitter.com/G4gXGGxKCM
— ANI (@ANI) August 20, 2021
या घटनेची माहिती मिळताच किंगगाव राजा पोलिस स्टेशनमधील पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली. जखमींना जालना जिल्ह्यातील रुग्णालयात नेण्यात आले. तर इतरांना सिंदखेडराजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, यापैकी अनेक मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार मधील होते.