Madhya Pradesh: स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीवेळी अपघात, 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
Madhya Pradesh Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील ग्वालियर (Gwalior) येथे ऐतिहासिक महाराज बाडे (Maharaj Bada) येथे घडलेल्या दुर्दैवी अपघातात तीन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हे कर्मचारी हाइड्रोलिक फायर ब्रिगेड च्या माध्यमातून महानगरपालिका इमारतीवर तिरंगा झेंडा लावत होते. ही सर्व स्वातंत्र्य दिन (Independence Day) सोहळ्याची पूर्व तयारी होती. सर्व कर्मचारी आपापल्या कामात व्यग्र होते. दरम्यान, नव्या वाहनात चुकीचे बटन दाबले गेल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये महानगरपालिका चौकीदार आणि अग्निशमन दलाचे दोन जवानांचा समावेश आहे. फायरब्रिकेड चालक गंभीर जखमी आहे.

हाइड्रोलिक फायर ब्रिगेडच्या वाहनाच्या ट्रॉलीत बसून हे सर्व कर्मचारी पोस्ट ऑफिस इमारतीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न करत होते. या वेळी ऑपरेटकरकडून चुकीचे बटन दाबले गेल्याने हा अपघात घडला. महाराजा बाडे येथील ऐतिहासिक इमारतीवर मोठ्या प्रमाणावर प्रतिवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. (हेही वाचा, Independence Day 2021 Quotes: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी महापुरूषांचे विचार Facebook, WhatsApp Status द्वारा शेअर करत खास करा राष्ट्रीय सण)

ट्विट

दरम्यान, या अपघाताची माहिती समजताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी दु:ख व्यक्त करत ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ग्वालियार येथील महाराजा बाडे येथील पोस्ट ऑफिस इमारतीवर मशीन अनलोड करताना दुर्घटना झाली. यात 3 कर्मचाऱ्यांचे निधन झाले. तर 3 गंभीर जखमी आहेत, अशी दु:खदायक माहिती समजली. मृतांच्या आत्मास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जखमींना लवकर आराम मिळो. ॐ शांती.

ट्विट

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे की, ग्वालियर येथे ध्वज लावताना क्रेनमध्ये अपघात होऊन काही लोकांचा मृत्यू आणि काही लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. पीडित कुटुंबांच्या प्रती माझ्या संवेदना. जखमींनी लवकर बरे व्हावे ही प्रार्थना. या घटनेची चौकशा व्हावी ही आमची सरकारकडे मागणी आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.