भारताचा यंदाचा स्वातंत्र्यदिन (Independence Day) खास आहे. यावर्षी भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. अर्थात भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांचा काळ लोटल्याने या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण स्वातंत्र्य उपभोगत असताना आपल्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणार्या अनेक थोर महात्मांचं स्मरण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्याप्रमाणे देशभरात गल्लीबोळ्यामध्ये ध्वजारोहण करून हा राष्ट्रीय उत्सव साजरा केला जाणार आहे. पण या दिवशी पुढच्या पिढीला भारताचा इतिहास सांगताना देशसेवेचं व्रत घेऊन जनसामान्यांमध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी उर्मी निर्माण करण्याकरिता थोर महापुरूषांनी दिलेली ही घोषवाक्य देखील नक्की पोहचवा. आज भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी WhatsApp Status, Stickers, Facebook Messages, Wishes, GIFs, HD Images, Photos द्वारा स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना हे Quotes शेअर करायला विसरू नका.
महात्मा गांधी, लोकमान्य टिळक ते सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या महान पुरूषांनी आपल्या सुखवस्तू आयुष्याचा त्याग करून देशसेवा केली. प्रसंगी तुरूंगवास भोगला. पण कधी लेखणीतून तर कधी भाषणामधून इंग्रजांची जुलमी सत्ता उलथून लावण्यासाठी त्यांनी समाजात प्रबोधन देखील केले. म्हणून आज आपण सुरक्षितपणे स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. मग आज भारवलेल्या वातावरणामध्ये तुम्ही देखील महापुरूषांची ही घोषवाक्य नक्की शेअर करा.
75व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
करो या मरो - महात्मा गांधी
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच - लोकमान्य टिळक
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा - मोहब्बत इक्बाल
वंदे मातरम - बंकिम चंद्र चटर्जी
सत्यमेव जयते - पंडीत मदन मोहन मालवीय
तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा – सुभाष चंद्र बोस
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है – राम प्रसाद बिस्मिल
यंदा देखील कोविड 19 संकटामुळे भारताचा स्वातंत्र्यदिन सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्येच साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. आजच्या दिवशी चौका-चौकांमध्ये तिरंगा मानाने डोलत असते. मिठाईचं वाटप केले जाते. लहान-मोठी मंडळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत हा राष्ट्रीय सण साजरा करत असतात. विविध सुरक्षा दलाकडून या दिवशी दिमाखदार परेडचं संचलन केले जाते. मग यंदा या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करताना तुमच्या सामाजिक जबाबदारीचं देखील भान ठेवायला विसरू नका.