'मम्मी माझे सर्वस्व! ती मला परत हवी' वरळी येथील BMW Hit And Run मध्ये ठार झालेल्या कावेरी नाखवा यांच्या मुलीची आर्त हाक (Watch Video)
Photo Credit - X

Worli BMW Hit-and-Run: वरळी येथे रविवारी 7 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास BMW कार ने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर कार चालक फरार झाला. या धडकेमुळे कावेरी रस्त्यावर पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ॲनी बेझंट रोडवर हा अपघात झाला. या घटनेला दोन दिवस उलटले आहेत. त्या दरम्यान, आता कावेरी नाखवा यांच्या मुलीला आईच्या विरहाचे दु:ख अनावर झाले आहे. "मी रडेली मम्मीला आवडत नाही. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पण, मी स्वतःला रोखू शकत नाही. मला माझी मम्मी परत हवी आहे. ती माझ्यासाठी सर्वस्व आहे. असे कावेरी नाखवा यांच्या मुलीने मुलाखतीत म्हटले आहे. (हेही वाचा:Mumbai Hit And Run Case: शिंदे गटातील शिवसेना उपनेते Rajesh Shah पोलिसांच्या ताब्यात; आदित्य ठाकरे यांची कडक कारवाईची मागणी )

व्हिडीओ

या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातून जप्त करण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू कार ची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेले राजेंद्रसिंग बिदावत आणि त्या व्यक्तीचे वडील राजेश शहा यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, मिहीर शाह फरार आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती वरळी पोलीसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.