Worli Heat And Run Case: मुंबई येथील वरळी परिसारत घडलेल्या हिट अँड रन (Heat And Run Case) प्रकरणात पोलिसांनी (Mumbai Police) एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव राजेश शहा (Rajesh Shah) असे आहे. हा व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde Faction) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) पक्षाचा पालघर (Palghar News) येथील उपनेता आहे. त्यांच्या वाहनाचा वरळी येथे अपघात झाला तेव्हा ते वाहनात नसल्याची प्राथमिक माहिती आहे. सांगितले जात आहे की, वरळी येथील घटना घडली तेव्हा शाह यांचा मुलगा आणि चालक त्यांच्या पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू (White BMW Car) कारमध्ये होते. दरम्यान, अपघात घडला तेव्हा कार नेमके कोण चालवत होते याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शाह यांचा मुलगा आणि चालक असे दोघेही फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे शिवसेना (UBT) अशी मागणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे.
BMW कार ताब्यात पोलिसांच्या ताब्यात
मुंबई पोलिसांकडून वरळी येथील अपघात प्रकरणाची तातडीने दखल घेत कारवाई सुरु झाली. या कारवाईनंतर पांढऱ्या रंगाची BMW कार ताब्यात घेण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात कारवर असलेले शिवसेना पक्षाचे चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार पुढ आला आहे. पोलिसांनी एका संशयितास बीएमडब्ल्यू कारसोबतच ताब्यात घेतल्याचे समजते. (हेही वाचा, Mumbai Hit And Run: मुंबई येथील वरळी परिसरात 'हिट अँड रन'; एक ठार, एक जखमी; वाहनचालक फरार)
दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे- आदित्य ठाकरे
दरम्यान, हिट अँड रन प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. शिवसेना (UBT) पक्षाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या घटनेनंत ठाकरे यांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांची भेट घेतली आणि माहिती जाणून घेतली. या प्रकरणास आपण कोणताही राजकीय रंग देऊ इच्छित नाही. पण, मुंबईतील गाड्या चालविण्याची पद्धत बिघडली आहे. त्यावर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण आणले पाहिजे. आरोपी कोण आहे की, घटनेत कोण अडकले आहे हे पाहण्यापेक्षा दोषींवर कारवाई व्हायला हवी. तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या पदावर आहे हे महत्त्वाचे नाही. त्यामुळे आपण या प्रकरणात राजकारण आणणार नाही. आमचे ते संस्कार नाहीत. फक्त या प्रकरणात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. (हेही वाचा, Pune Hit And Run Accident: पुणे जिल्ह्यात पुन्हा 'हिट अँड रन'; पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी येथे भरधाव कारने तरुणीला चिरडले (Watch Video))
एक्स पोस्ट
मुंबईतल्या वाहनचालकांची ड्रायव्हिंगची पद्धत आणि शिस्त ह्यावर आम्ही सातत्याने बोलत आलोय.
उलट दिशेने गाड्या चालवणं, सिग्नल न पाळणं, ट्रिपल सीट जाणं... सगळंच मुंबईत वाढत चाललंय जे आधी नव्हतं! पण आता तर हिट ॲंड रन सारखे प्रकार घडायला लागलेत! अपघात करणाऱ्या त्या व्यक्तीला जरी तातडीने…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 7, 2024
आदित्य ठाकरे यांची एक्स पोस्ट
वरळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माहिती घेण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ''मुंबईतल्या वाहनचालकांची ड्रायव्हिंगची पद्धत आणि शिस्त ह्यावर आम्ही सातत्याने बोलत आलोय. उलट दिशेने गाड्या चालवणं, सिग्नल न पाळणं, ट्रिपल सीट जाणं... सगळंच मुंबईत वाढत चाललंय जे आधी नव्हतं! पण आता तर हिट ॲंड रन सारखे प्रकार घडायला लागलेत! अपघात करणाऱ्या त्या व्यक्तीला जरी तातडीने अटक करण्यात आली असली, तरी अशा घटना होऊच न देणं गरजेचं आहे. त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन ही परिस्थिती आपल्याला सुधारायला लागेल! मुंबईची वाहतुक शिस्त आणि सुरक्षा परत आणायला लागेल! वाहतुकीचे नियम पाळले जातील, वाहकांना शिस्त लागेल आणि चूका करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल, ह्याची काळजी घ्यावी लागेल!''