Pravin Darekar And Sanjay Raut (Photo Credit: Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) हे राज्याचे प्रमुख असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यपालांना भेटणे योग्य नसल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही. राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे. उद्धव ठाकरे हे नेत्यांचे काम करत नाहीत. त्यामुळेच सगळ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाण्याची वेळ येते, असे अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच याआधी नेते राज्यपालांची भेट घेत नव्हते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, वाढीव वीज बिल आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी 29 ऑक्टोबर रोजी राजभवनावर जाऊन भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असतील. पण मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणे योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले होते.

या टीकेला प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. या भ्रमातून शिवसेनेने लवकरात लवकर बाहेर आले पाहिजे. या राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे. राज्यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर राज्य सरकारकडून मिळत नाही म्हणून सगळे जण राज्यपालांना जाऊन भेटत आहेत, असे दरेकर म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Joe Biden यांच्या सभेचा Sharad Pawar यांच्या सातारा सभेशी संबंध जोडत रोहित पवार यांनी बांधला अमेरिकेतही सत्तांतर अंदाज; पहा ट्विट

तसेच शिवसेनेने विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची उमेदवारी निश्चित केली आहे. यावरूनही प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. विधान परिषदेची उमदेवारी कुणाला द्यावी? हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. पण निष्ठावंत शिवसैनिकांचे काय?, असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.