Brahamdev Mandal | (Photo Credit - Twitter/ANI)

देशात सुरुवातीला कोरोना लस (Covid vaccine) पुरेशा प्रमाणात मिळत नव्हती. आता ती मिळते आहे तरी अनेक लोक कोरोना लस घ्यायला घाबरत आहेत. अस विरोधाभासात्मक चित्र असताना बिहारमधील (Bihar) एका 84 वर्षांच्या नागरिकाने कमालच केली आहे. या पठ्ठ्याने एक दोन नव्हे तर तब्बल 11 वेळा कोरोना लस घेतली आहे. बिहार राज्यातील मधेपुरा (Madhepura District) जिल्ह्यातील उदाकिशुनगंज (Udakishunganj) येथील ओराय गावाचे रहिवासी असलेल्या या नागरिकाचे नाव ब्रह्मदेव मंडल असे आहे. ब्रह्मदेव यांचा दावा असा की, कोरोना लस घेतल्याने 'बरे वाटते आणि प्रकृती सुधारते. शरीराला असलेल्या विविध प्रकारच्या व्याधींपासून आराम मिळतो.' हे सद्गृहस्त काही दिवसांपूर्वी कोरोनाची लस 12 व्या वेळा घेण्यास लसीकरण केंद्रावर पोहोचले होते. मात्र, लसीकरण केंद्राची वेळ संपल्याने त्यांना हा डोस घेता आला नाही.

ब्रह्मदेव यांनी 11 वेळा लस घेतल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर परिसरातील अधिकारी असलेल्या सीव्हील सर्जन यांनी या प्रकरणाची चौकशी होईल असे म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मदेव मंडल हे 12 व्या वेळी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहोचले होते. त्यासाठी ते चौसा PH येथे पोहोचले. ब्रह्मदेव यांच्या दाव्यानुसार त्यांनी 13 फेब्रुवारी 2021 पासून आतापर्यंत 11 वेळा कोरोना लस घेतली आहे. 13 फेब्रुवारीला त्यांनी पहिला डोस पुरानी PHC येथे घेतला. दुसरा डोसही त्यांनी त्याच ठिकाणी 13 मार्चला घेतला. तिसरा डोस त्यांनी 19 मे रोजी औराय उपआरोग्य केंद्रात घेतला. (हेही वाचा, First Omicron Death in India: भारतामध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू; केंद्र सरकारने केली पुष्टी )

भूपेंद्र भगत येथील कोटा येथे लावण्यात आलेल्या एका कॅम्पमध्ये ब्रह्मदेवांनी चौथा डोस 16 जून रोजी घेतला. पाचवा डोश 24 जुलै रोजी जुनी मोठी हॉट स्कूल येथे आयोजित कँपमध्ये घेतला. त्यानंतर नववा डोस त्यांनी 24 सप्टेंबर रोजी आरोग्य उपक्रेंद्र कलासन येथे जाऊन घेतला. आपल्याला वेगवेगळ्या वेळी कोरोना लस घेता यावी यासाठी या महोदयांनी आपला मोबाईल नंबरही बदलला. 10 कोरोना डोस त्यांनी खगडिया जिल्ह्यातील परबत्ता येथे घेतला. 11 वाडोस त्यांनी भागलपूर येथील कहलगाव येथे घेतला.

ट्विट

नाव न छापण्याच्या अटीवर एका आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याने सांगितले की, ऑफलाईन कँम्पमध्ये लोक अशा प्रकारची गडबड करतात. ऑनलाईन कँम्पमध्ये त्यांना असे करता येत नाही. कारण ऑफलाईन केंद्रांवर केवळ मोबाईल नंबर आणि आधार नंबरच घेतला जातो. हे क्रमांक नंतर कॉम्पूटरमध्ये फिड करतात. हे क्रमांक फीड करताना अनेकदा मॅच होत नाहीत. त्यामुळे ते बादही ठरतात.