Maharashtra Cyber (PC - Twitter)

नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट (Netflix Fake Website) संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागातर्फे (Maharashtra Cyber Department) करण्यात आले आहे. सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे. काही नेटफ्लिक्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या बिलिंग अपयशाच्या समस्येसंदर्भात ईमेल प्राप्त झाले आहेत.

ईमेलने वापरकर्त्यांच्या नेटफ्लिक्स सदस्यता 24 तासांत रद्द करण्याचा दावा केला आहे. ज्यामुळे अनेकजण त्यांचे पेमेन्ट पूर्ण करण्यासाठी लिंक वर क्लिक करतील. एकदा वापरकर्त्याने लिंकवर क्लिक केले की, वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाइटवर नेले जाते. वापरकर्त्यांना त्यांचे नेटफ्लिक्स लॉगिन प्रमाणपत्रे, बिलिंग पत्ता आणि क्रेडिट कार्ड तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाते. एकदा पूर्ण माहिती प्रविष्ट केल्यावर वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल वेबसाइटवर नेले जाते. या प्रकारे फिशिंगचा प्रवाह पूर्ण होतो. अशा प्रकारे वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या कार्डची माहिती घेतली जाते आणि फिशिंग घोटाळ्याला बळी पाडले जाते. (हेही वाचा - गृहमंत्र्यांच्या रुपाने महिला पोलिसांना मिळाला हक्काचा भाऊ; अनिल देशमुख यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन; पहा फोटो)

सेन्डर्स चा ई-मेल आय डी पाहता (netfiix@csupport.co), हे स्पष्ट होते की, सायबर क्रिमिनल्सनि तो कायदेशीर (ओरिजिनल) दिसावा म्हणून पुरेपुर प्रयत्न केला आहे. ज्यामुळे नेटफ्लिक्स ग्राहक फिशिंग घोटाळ्याला बळी पडतील. त्यामुळे महाराष्ट्र सायबरतर्फे असे आवाहन करण्यात आले आहे की, फिशर्सना ओरिजिनल कंपनीचा लोगो वापरकर्त्यांना फसवण्यासाठी कशा प्रकारे वापरायचे हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून आपण क्लिक करण्यापूर्वी विचार करावा.

आपणास प्राप्त झालेला ईमेल आणि त्याचा ईमेल आयडी काळजीपूर्वक तपासा. सर्वचं वेबसाईट ओरिजिनल नसतात. त्यामुळे सगळ्याच वेबसाईटवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा संशयास्पद ईमेलमधील अँट्यचमेंट डाउनलोड करू नका. आपली वैयक्तिक महिती किंवा बँक, के्डिट/डेबिट कार्ड आणि ओटीपी इ. तपशील कोणाशीही शेअर करु नका. अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्यापूर्वी ओरिजिनल नेटफ्लिक्स वेबसाइट वर जा आणि आपले बिल पेमेन्ट इत्यादी तपशील पडताळून बघा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.