BEST bus (Photo Credits: PTI)

भारतीय रेल्वेप्रमाणे आता बेस्टकडून सुद्धा युनिव्हर्सल पास अनिवार्य करण्यात येणार आहे. शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेस्ट बसमध्ये होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या गाइडलाइन्सनुसार दोन्ही लसीचे डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहतूकीतून प्रवास करता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.(COVID 19 In Maharashtra: राज्यात 481 निवासी डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात)

वाहतूक विभागाकडून ही Chalo App हे Co-WIN सोबत लिंक करावे असे सांगण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना लसीचे दोन्ही डोसचे सर्टिफिकेट दाखवल्यानंतर कोणत्याही समस्येशिवाय प्रवास करता येणार आहे. म्हणजेच प्रवाशांना बेस्टच्या अॅपवर लसीकरणाचे दोन्ही सर्टिफिकेट असलेल्यांना तिकिट खरेदी करता येणार आहे. याशिवाय कंडक्टर जेव्हा बसमध्ये येईल तेव्हा पूर्ण लसीकरणाचे सर्टिफिकेट दाखवावे लागणार आहे.

प्रवाशांसाठी चलो अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने तिकिट काढता येणार आहे. आतापर्यंत 3 लाख नागरिकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. आकडेवारीनुसार, 46-48 लाख लोक दररोज मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. सध्या 27-28 लाख लोक बेस्टच्या माध्यमातून प्रवास करतात. त्यामुळे कामाला जायच्यायायच्या वेळेत यामध्ये खुप गर्दी होते.(Mumbai: गेल्या 11 महिन्यांतील Covid-19 मृत्यूंपैकी 94 टक्के लोकांचे लसीकरण झाले नाही- BMC)

बेस्टच्या माध्यमातून दोन्ही लस झालेल्यांचे सर्टिफिकेट बसमध्ये आणि बस्ट थांब्याच्या येथे तपासून पाहिले जात होते. ही मोहिम मुंबईसह उपनगरात चालवली जात होती. गेल्या वर्षापासून युनिव्हर्सल पास हा शासकीय वेबसाइटच्या माध्यमातून काढण्याची सुविधा दिली उपलब्ध करुन दिली गेली आहे. हा पास तेव्हा फक्त रेल्वे लोकल ट्रेनसाठी अनिवार्य होता. परंतु आता बेस्टला  सुद्धा त्याची पुर्तता करावी लागणार आहे.