Coronavirus: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड पोलिसांनी (Beed Police) जिल्ह्यातील सर्व सीमा 14 चेकनाक्याच्या माध्यामातून बंद केल्या आहेत. तसेच सीमेलगतच्या गावातून चोरट्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी सीमेलगत जिल्ह्यात प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद करून जिल्हातील सीमा तंतोतंत बंद केल्या आहेत. यासंदर्भात बीड पोलिसांनी ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच राज्यात लॉकडाऊन असल्याने शहरातील नागरिक आपल्या मुळ गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे गावातदेखील कोरोनाचा पसरण्याची भीती आहे. अद्याप बीड जिल्ह्यात एकही कोरोना बाधित सापडलेला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - राज्यातील 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 11 हजार 966 कोटी 21 लाख रुपयांची कर्जमाफी रक्कम जमा - उपमुख्यमंत्री अजित पवार)
जिल्ह्यात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 चेकनाके यांच्या माध्यमातून सीमा बंद केल्या आहेत.तरी सीमेलगतच्या गावातून चोरट्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी सीमेलगत जिल्ह्यात प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद करून जिल्हा केला तंतोतंत सीमा बंद. pic.twitter.com/B5wTDszkPy
— SPBeed (@BEEDPOLICE) April 1, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला सहकार्य करून धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद ठेवणाऱ्या पंडित, मौलवी व धर्मगुरू यांचे बीड पोलीसांकडून प्रशस्तीपत्र देऊन आभार व अभिनंदन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्याततील पोलीस प्रशासनाला सहकार्य करून धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद ठेवणाऱ्या पंडित, मौलवी व धर्मगुरू यांचे बीड पोलीसांकडून प्रशस्तीपत्र देऊन आभार व अभिनंदन करण्यात आले. pic.twitter.com/omO9stPZBY
— SPBeed (@BEEDPOLICE) April 1, 2020
दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून कोरोना विरोधातील लढाईस बीड प्रशासन सज्ज असल्याचं म्हटलं आहे. बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा-उपजिल्हा रुग्णालय, अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांत आयसोलेशन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, औषध साठा आदी उपाययोजनांसाठी 11 कोटी 8 लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं आहे.
बीड जिल्हा वार्षिक योजनेतून कोरोनासंदर्भात आतापर्यंत निधी व मनुष्यबळ भरती युद्धपातळीवर सुरू आहे. एकही रुग्ण कोरोनासदृश्य जिल्ह्यात आढळलेला नाही. मात्र संभाव्य धोका लक्षात घेता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी निधीची कमतरता पडणार नाही. मंजूर झालेला निधी यंत्रणेस वितरित केला आहे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 1, 2020
याशिवाय बीड जिल्हा वार्षिक योजनेतून कोरोनासंदर्भात आतापर्यंत निधी व मनुष्यबळ भरती युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकही कोरोनासदृश्य रुग्ण आढळलेला नाही. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी निधीची कमतरता पडणार नाही. मंजूर झालेला निधी यंत्रणेस वितरित केला आहे, असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.